यंदाची गणेश स्थापना करतांना करु नका या चूका : जाणून घ्या स्थापना मुहूर्त व पूजा याबद्दलची सविस्तर माहिती वाचा आत्ताच.!!

मित्रांनो आपल्या भारत देशात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळचा उत्साह प्रचंड मोठा असतो. यावर्षी श्री गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. आपल्या देशात महाराष्ट्रात या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, यूपी आणि आंध्र प्रदेश यासारख्या इतर राज्यांमध्ये देखील गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

त्याचबरोबर मित्रांनो गणेशोत्सव दीड किंवा तीन दिवस किंवा दहा दिवस साजरा केला जातो. दहा दिवस पूजा आरती केल्यानंतर अनंत चतुर्दशीला लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची परंपरा आहे. गणेश भक्त विसर्जनाच्या वेळी वाजत गाजत मिरवणुका काढतात आणि बाप्पाला पुढच्या वर्षी परत येण्याची प्रार्थनाही करतात.

दरम्यान आपल्याकडील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजेचे विशेष महत्त्व असते. यावेळी गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी दुपारी 12:17 वाजता शुभ मुहूर्त सुरू होईल आणि रात्री 10 पर्यंत राहील. पूजेच्या वेळी गणपतीच्या मंत्राचा जप केला जातो. पूजा करताना गणपती बाप्पाला गुलाल लावा, त्यानंतर ‘ओम गं गणपतये नम:’ या मंत्राचे पठण करा आणि दुर्वा अर्पण करा. पूजेच्या वेळी श्री गणेश स्तोत्राचा पाठ करणे शुभ मानले जाते.

मित्रांनो बाप्पाची स्थापना करताना पूजेच्या आणि आरतीच्या वेळी प्रसादामध्ये काय विशेष ठेवावे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत असे मानले जाते. बाप्पाला मोदक अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. तर मित्रांनो बाप्पाची स्थापना करताना आणि पूजा करताना पाळावयाचे आणखी काही महत्त्वाचे नियम आता आपण पाहू….

मित्रांनो गणेश चतुर्थी दिवशी सकाळी आंघोळ आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर गणपती बाप्पाला घेण्यासाठी जा. गणपतीची मूर्ती खरेदी करताना लक्षात ठेवा की मूर्ती मातीची असावी, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर रसायनांची नाही. तसेच श्री गणेशाची मूर्ती घेताना बसलेली गणेशमूर्ती घेणे शुभ मानले जाते. त्यांची सोंड डावीकडे असावी आणि उंदीर हे त्यांचे वाहन त्यासोबत असावे.

मित्रांनो पूजेची सुरुवात करताना सुरुवातीला स्वच्छ आसनावर बसवून सर्वप्रथम गणपतीला पंचामृताने स्नान घाला. यानंतर त्यांना केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा आणि त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करा.

जोपर्यंत गणपती घरात राहतात तोपर्यंत त्या काळात गणेश चतुर्थीची कथा, गणेश पुराण, गणेश चालीसा, गणेश स्तुती, श्री गणेश सहस्त्रनामवली, गणेशाची आरती, संकटनाशन गणेश स्तोत्र इत्यादींचे पठण करा.

आपल्या श्रद्धेनुसार गणपतीच्या मंत्राचा जप करा आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांची आरती करा. असे मानले जाते की असे केल्याने गणपती कुटुंबातील सर्व अडथळे दूर करतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. अधिक माहितीसाठी आपण जवळच्या ज्योतिष कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment