नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, धार्मिक शास्त्रानुसार, संत तुलसीदास यांचा जन्म श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला झाला होता, ज्यांच्या सन्मानार्थ आजही तुलसीदास जयंती साजरी केली जाते. तुलसीदासजींनी हिंदू धर्माचा महान ग्रंथ श्री रामचरितमानस याची रचना केलेली आहे.
त्यांनी या ग्रंथात मानवी जीवनाला योग्य असे मार्गदर्शन करून नवचैतन्यच दिले आहे. जीवनातील संकटांना सामोरे कसे जावे आपले वर्तन कसे असावे याबद्दल खूप महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत.
तर आज तुलसीदास जयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून वाचावे असे त्यांचे दोहे आपणास सांगत आहोत. ज्यांच्या केवळ वाचनाने आपल्या समस्या नाहीश्या करण्याचे मार्ग आपल्याला मिळतील.
1) तुलसी साथी विपत्ति के, विद्या विनय विवेक। साहस सुकृति सुसत्यव्रत, राम भरोसे एक।
या दोह्यात तुलसीदासजींनी अशा गुणांबद्दल सांगितले आहे जे आपत्तीच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला वाचवू शकतात. ते 7 गुण आहेत-
1 विद्या, 2 विनय, 3 विवेक, 4 धैर्य, 5 तुमचे चांगले कर्म, 6 सत्यनिष्ठ आणि 7 देवावर तुमचा विश्वास.
2) सूर समर करनी करहिं कहि न जनावहिं आपु। बिद्यमान रन पाइ रिपु कायर कथहिं प्रतापु ।
तुलसीदास जी सांगतात की शूर लोक श त्रू समोर यु द्ध भूमीवर आपले शौ र्य दाखवतात, परंतु भ्याड लोक लढा देऊन नव्हे तर ते फक्त मोठमोठ्या बाताच करून स्वतःची ला य की दर्शवतात.
3)आवत ही हरषै नहीं नैनन नहीं सनेह। तुलसी तहां न जाइये कंचन बरसे मेह।
तुलसीदास सांगतात की ज्या ठिकाणी तुम्ही गेले असता तुमचा अपमान केला जातो किंवा ज्या लोकांना तुमचे तेथे येणे आवडत नाही त्याठिकाणी चुकून ही जाऊ नये. ज्यांच्या नजरेत आपल्याविषयी प्रेम नाही, आपण तेथे जाण्याने त्यांना प्रसन्न वाटत नसेल तर कितीही जवळचे संबंध असो तरीही अजिबात जाऊ नये.
4) तुलसी मीठे बचन ते सुख उपजत चहुं ओर। बसीकरन इक मंत्र है परिहरू बचन कठोर।
तुलसीदास जी म्हणतात की व्यक्तीचे बोलणे नेहमीच मधुर असावे, कुठेही गेलो तरी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण करता आले पाहिजे. मधुर भाषण ही सर्वांना आपलंसं करता येण्याची गुरुकिल्ली आहे म्हणून आपण नेहमी तिचा वापर केला पाहिजे आणि कटू भाषण करू नये. कोणालाही दुःखावू नये.
5) तुलसी भरोसे राम के, निर्भय हो के सोए। अनहोनी होनी नही, होनी हो सो होए।
तुलसीदास जी म्हणतात की देवावर विश्वास ठेवा तोसर्वकाही मंगल करेल. कोणतीही अमंगल घटना जर घडणार असेल तर घाबरून न जाता देवावर विश्वास ठेवून धैर्याने त्यास सामोरे जा. दैवी शक्तीवर कधीही अविश्वास दाखवू नका.
तुमची देवावरील असलेली श्रद्धाच तुमचे सारे संकट दूर करेल. जे घडायचे ते घडणारच आपण त्याची व्यर्थ चिंता करत बसू नये. देव आपल्या पाठीशी ठाम उभा आहे हि जाणीवच पुष्कळ आहे.
अशा प्रकारे तुलसीदास सांगतात त्याप्रमाणे जर तुम्ही आचरण केले, त्यांच्या नियमांचे आपल्या जीवनात पालन केले तर नक्किच फलदायी ठरेल. तुमचे जीवन यशस्वी होईल.