Friday, December 8, 2023
Homeसामान्य ज्ञानयूट्यूब देत आहे तुम्हाला अधिक पैसे कमावण्याची संधी, दरमहा 7.5 लाख रुपये...

यूट्यूब देत आहे तुम्हाला अधिक पैसे कमावण्याची संधी, दरमहा 7.5 लाख रुपये मिळू शकतात…!!!

यूट्यूब देत आहे तुम्हाला अधिक पैसे कमावण्याची संधी, तुम्हाला यूट्यूब शोर्ट्स बनवण्यासाठी सुमारे 7.5 लाख रुपये मिळू शकतात…!!!

नमस्कार मित्रांनो,
जर तुम्ही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असाल तर यूट्यूब तुम्हाला अधिक पैसे कमवण्याची संधी देत ​​आहे. टिकटॉकचा वापर जगभरात वाढताना दिसत आहे.

अशा स्थितीत युट्यूब शॉर्ट्सकडे यूजर्सला आकर्षित करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे फेसबुकने टिकटॉकची कॉपी करत शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म सुरू देखील केला आहे व व्हिडीओ वर जाहिरात देखील दाखवत आहे.

इन्स्टाग्राम रील आणि टिकटॉकशी स्पर्धा करण्यासाठी यूट्यूब शॉर्ट्स प्रक्षेपित करण्यात आले आहे. आता कंपनी त्यावरील मूळ कंटेंट साठी अधिक पैसे देणार आहे. युट्यूब आपल्या शॉर्ट्स प्लॅटफॉर्मला अजून सोपे बनवत आहे, जेणेकरून अनेकजण या प्लॅटफॉर्म्सशी जोडले जातील व व्हिडीओ तयार करतील.

यूट्यूब शॉर्ट्स निधी उपलब्ध केला गेला आहे. यामध्ये, निर्मात्यांसाठी 100 दशलक्ष डॉलर्सचा निधी देण्याचे म्हटले आहे. 2021 आणि 2022 मध्ये $ 100 दशलक्ष वितरित केले जातील. यूट्यूब दर महिन्याला पात्र सामग्री निर्मात्यांशी संपर्क साधेल आणि त्यांना हजारो डॉलर्स देईल.

यूट्यूब ने सांगितले की, निर्माते $ 100 (जवळपास 7,400 रुपये) पासून ते $ 10,000 (7,40,000 रुपये) पर्यंत कमवू शकतात.

यूट्यूबने म्हटले आहे की शॉर्ट्समधून कंटेंट निर्माते जे पैसे कमवतील हे दर्शक (व्ह्यूअर) आणि प्रतिबद्धतेवर (एंगेजमेंट) अवलंबून असते. यामुळे निर्मात्यांना मागील महिन्याच्या शॉर्ट्स कामगिरीवर आधारित बोनस पेमेंटचा दावा करण्याची संधी मिळेल.

यूट्यूबने म्हटले आहे की चॅनेलचे शॉर्ट्स त्यांच्या मासिक कामगिरीवर मोजले जातील. म्हणजेच, दर महिन्याला किती लोक ते शोर्ट्स व्हीडीओ पाहतात यावर अवलंबून असेल आणि केवळ ज्या महिन्यात ती अपलोड केली गेली होती त्यावर अवलंबून नाही.

याचा अर्थ असा की जर एखादा निर्माता एका महिन्यासाठी पात्र ठरला नाही तर तो पुढील महिन्यात पात्र होऊ शकतो. या बोनसचा लाभ घेण्यासाठी कंपनीने कोणत्याही विशिष्ट कामगिरीच्या मर्यादेचा उल्लेख केलेला नाही. बोनस पेमेंटसाठी कामगिरीचा स्तर दरमहा बदलू शकतो.

हे अनेक घटकांवर अवलंबून असते. चॅनेलवर चांगल्या प्रतिची माहिती असलेले शॉर्ट्स असावेत आणि 180 दिवसांमध्ये एक पात्र शॉर्ट्स चॅनेल अपलोड केले जाणे आवश्यक आहे.

दरम्यान, तुम्ही जर युट्यूब अ‍ॅपचा वापर करत असाल तर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये अनेक छोटे व्हिडीओ दिसतील, जे यूजर्सने अपलोड केले आहेत. कंपनीने व्हिडीओ तयार करण्यासाठी शॉर्टस बटन देखील दिले आहे, ज्यामुळे कोणालाही सहज व्हिडीओ तयार करून अपलोड करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स