झोपलेल्या व्यक्तीस ओलांडून पुढे जाणं इतकं अशुभ असतं का.? बघा शास्त्र काय सांगते..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…

एखादी व्यक्ती झोपली असेल तर तिला ओलांडून पुढे जाऊ नये, असं आपल्याला लहानपणी घरातल्या मोठ्या व्यक्तींनी सांगितलेलं असतं. झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाणं धर्मशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. हिंदू धर्मात अनेक प्रथा, परंपरा, चालीरीती आहेत. तसंच मानवी जीवनाविषयी काही नियमदेखील सांगितलेले आहेत. प्रत्येकाने या नियमांचं पालन करावं, असा संकेत आहे.

मात्र एखाद्यावेळी अनावधानाने आपल्या हातून एखादी चूक घडते. अशी चूक धर्मशास्त्रानुसार अशुभ मानली जाते. लहानपणी आपल्या अशा नियमांविषयी सांगितलं जातं. तरीदेखील आपण एखादी चूक करून बसतो. एखादी व्यक्ती झोपली असेल तर तिला ओलांडून पुढे जाऊ नये.

असं आपल्याला लहानपणी घरातल्या मोठ्या व्यक्तींनी सांगितलेलं असतं. अनवधानाने काही वेळा ही चूक होते. झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाणं धर्मशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. या नियमाला महाभारतातल्या एका कथेचा आधार आहे. ही कथा नेमकी काय आहे ते जाणून घेऊ या.

झोपलेल्या माणसाला ओलांडून का जाऊ नये?

झोपलेल्या माणसाला ओलांडून पुढे जाऊ नये, असा नियम हिंदू धर्मात आहे. झोपलेल्या माणसाला ओलांडून पुढे जाणं अशुभ मानलं जातं. धर्मशास्त्रातले अनेक नियम, परंपरांप्रमाणेच या नियमाला महाभारतातल्या एका कथेचा आधार आहे. अनेक वर्षांपासून हिंदू धर्मातले नागरिक या नियमाचं पालन करत आले आहेत. कोणत्याही व्यक्तीला ओलांडून पुढं जाणं हा देवाचा अपमान समजला जातो.

भीम एकदा युद्धासाठी जात होता. त्या वेळी भीमाचा रस्ता रोखण्यासाठी श्री हनुमान वृद्ध वानराचं रूप घेऊन भीमाच्या वाटेत झोपले. हनुमानाच्या शेपटीनं भीमाचा मार्ग अडवला. जेव्हा भीम त्या मार्गावरून जात होता, तेव्हा तो हनुमानाची शेपटी ओलांडून पुढे गेला नाही. भीमाने श्री हनुमानाला शेपटी बाजूला घेण्याची विनंती केली.

पण त्यांनी शेपटी बाजूला घेण्यास नकार दिला आणि शेपटी ओलांडून जाण्यास सांगितलं. भीमाने शेपटी ओलांडून जाणं टाळलं आणि स्वतः शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न केला; पण पूर्ण ताकद लावूनही भीम हनुमानाची शेपटी बाजूला करू शकला नाही.

त्या वेळी हा कोणी साधारण वानर नाही, हे भीमाच्या लक्षात आलं. तेव्हा हनुमानाने भीमाला स्वतःची ओळख पटवून देऊन विशाल रूपात दर्शन दिलं. त्यानंतर हनुमानाने भीमाला युद्धात विजयी होशील, असा आशीर्वाद दिला.

या घटनेत हनुमानाने सांगूनदेखील भीमाने त्याची शेपटी ओलांडली नाही. तेव्हा भीम म्हणाला, की सर्व सजीवांमध्ये ईश्वराचा अंश असतो. त्यामुळे कोणत्याही सजीवाला ओलांडून जाणं म्हणजे देवाचं अपमान करणं होय.

या विचारामुळे भीम हनुमानाची शेपटी ओलांडून पुढे गेला नाही. हाच नियम आजही हिंदू धर्मातले नागरिक पाळतात. त्यामुळे कोणीही झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून पुढे जात नाही. अशा पद्धतीने जाणं हे अशुभ मानलं जातं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment