झोपतांना तुम्ही जसे विचार करणार तेच तुम्हाला मिळेल, चांगल्या आयुष्यासाठी तुम्ही हे जाणून घेणं खुप आवश्यक आहे..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल आणि यशाबद्दल चिंतित असते, प्रयत्न करते आणि भविष्य कसे असेल त्याबद्दल विचार करते.

पण तुम्हाला माहित आहे का की भविष्य त्या कामावर अवलंबून आहे जे यश सुनिश्चित करते. रात्री झोपण्यापूर्वी करावयाच्या काही उपायांबद्दल जाणून घ्या जे भविष्याला आकार देण्याचे काम करतात.

1) झोपताना आपले पाय कोणत्या दिशेला आहेत हे लक्षात ठेवा. वास्तुमध्ये या गोष्टीला विशेष महत्त्व आहे की तुम्ही कोणत्या दिशेने डोके ठेवून झोपता. असे केल्याने धनलाभाबरोबरच झोपही चांगली येते दक्षिण किंवा पूर्व दिशेकडे कधीही पाय करून झोपू नका.

तसेच आपले पाय दरवाजाच्या दिशेने देखील ठेवू नका. यामुळे आरोग्य आणि समृद्धीचे नुकसान होते. पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने ज्ञान वाढते. दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्याने शांती, आरोग्य आणि समृद्धी मिळते.

2) झोपण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दात न घासता कधीही झोपू नये. जर तुम्ही रात्रीचे जेवण केल्यानंतर दूध पित असाल, तर झोपण्यापूर्वी दात घासावे किंवा गुळणी करून झोपावे.

हे आरोग्याच्या दृष्टीने देखिल चांगले आहे. याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवुन झोपावे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमचे पाय धुतले, तर ते व्यवस्थित कोरडे करा आणि मग झोपा.

शास्त्रांमध्ये कोरड्या पायांनी झोपणे समृद्धी वाढवणारे मानले जाते. तर ओले पाय हे दारिद्र्य वाढवणारे मानले जातात. याचबरोबर खालच्या दिशेने तोंड करुन किंवा दुसऱ्याच्या बेडवर, तुटलेल्या बेडवर आणि स्वच्छता नसलेल्या घरात झोपू नये.

3) सरळ झोपणारे योगी, दामा (डावीकडे) झोपणारे निरोगी आणि जिमना (उजवीकडे) झोपणारे रोगी! श री र शास्त्र म्हणते की सरळ झोपल्याने पाठीच्या कण्याला नुकसान होऊ शकते तर उलटे झोपल्याने डोळ्यांना नु क सा न होते. पोटावर झोपल्याने मणक्यावर वाईट परिणाम होतो.

याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही पोटावर झोपता तेव्हा पोटावर अधिक भार येतो त्यामुळे मणका वाकला जातो. मणका हा श री रा चा मुख्य आधार असतो. श री रा तील सर्व महत्वाच्या अवयवांकडे जाणाऱ्या मज्जातंतू मणक्याशी सं बं धि त असतात.

त्यामुळे मणक्यावर ताण आल्यास श री राचा इतर भाग बधीर होऊन वेदना होण्याची शक्यता असते. मणक्याच्या दुखण्याबरोबरच पोटावर झोपल्यामुळे सांधे दुखणे, मानेच्या वेदना आणि पाठ दु खी ची समस्या होऊ शकते. त्यामुळे झोप पूर्ण करणे अशक्य होते. अपूर्ण झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवत राहतो.

4) जर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी कापूर जाळून झोपलात तर तुम्हाला चांगली झोप येईल तसेच सर्व प्रकारचे ताण संपतील. कापूरचे इतरही अनेक फायदे आहेत. हिंदू धर्मियांमध्ये पूजेमध्ये कापूर हा प्रामुख्याने वापरला जातो. धूप, आरती यामध्ये कापूर वापरला जातो.

कापूर घरात जाळल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते. पण या धार्मिक कारणांसोबतच काही आरोग्यदायी कारणांसाठीदेखील कापराचा वापर होऊ शकतो. कापरामुळे कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते.

कापूर वातावरणातील हवा शुद्ध ठेवायला मदत करते. त्यामुळे दररोज कापूर जाळणे ही सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे नैसर्गिकरित्या घरातील कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.

5) झोपायच्या आधी आयुष्यात तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींचा विचार करा. नकारात्मक गोष्टींची अजिबात काळजी करू नका, कारण झोपण्यापूर्वी 10 मिनिटांपर्यंतचा वेळ अत्यंत संवेदनशील असतो, या काळात अवचेतन मन जागृत होऊ लागते आणि उठल्यानंतर किमान 15 मिनिटे देखील खूप संवेदनशील असतात. या दरम्यान तुम्ही जे काही विचार करता, ते प्रत्यक्षात घडू लागते.

आपण झोपायला जात असताना पलंगावर झोपत असताना नकारात्मक गोष्टींवर लक्ष न ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी, आपले डोके शांत करण्यासाठी थोडा वेळ घ्या आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करा. बाह्य जीवनात कमीतकमी तणाव असण्यावर तुम्ही जितके लक्ष केंद्रित कराल तितके तुमचे आंतरिक जीवन शांत होईल.

6) रात्रीचे जेवण झोपेच्या 2 तास आधी घ्यावे. रात्रीचे जेवण हलके आणि सात्विक असावे. चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता, त्याहून थोडे कमी दुपारचे जेवण व सर्वात कमी रात्रीचे जेवण घेणे हितावह आहे.

रात्रीचे जेवण भरपेट व अतिमसालेदार देखील असू नये. यांमुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते. म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच हितावह आहे .

7) झोपेचा अभाव हा स्मरणशक्तीशी जोडलेला असतो. चांगल्या स्मरणशक्तीसाठी झोप महत्वाची भूमिका बजावते. काही संशोधन दर्शवते की जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा तुमच्या स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणुन चांगल्या झोपेसाठी जेवल्यानंतर, वज्रासन करावे, नंतर भ्रमरी प्राणायाम करावे आणि शेवटी श वा स न करताना झोपावे.

तसेच सकाळी उठल्यानंतर, ज्याप्रमाणे आपण देवाचे स्मरण करून आपल्या दिवसाची सुरुवात करतो, त्याचप्रकारे झोपायच्या आधी देवाची प्रार्थना करुनच आपण अंथरुणावर झोपले पाहिजे आणि कुलदेवतेचेही स्मरण केले पाहिजे. यामुळे आपल्याला गाढ झोप येईल व आपली झोप रात्रीतून मोडणार नाही.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment