6 जानेवारी पौष पौर्णिमा रात्री 12 वाजता गुपचूप इथे लावा 1 दिवा… माता लक्ष्मी करेल धन वर्षाव…!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे…! पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा पौष पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि जप याला खूप महत्त्व आहे. यावर्षी पौष पौर्णिमा शुक्रवार, ६ जानेवारी २०२३ रोजी आहे. पौष पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी विधिपूर्वक पूजा केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते. यासोबतच सूर्यदेवाला स्नान, दान आणि अर्घ्यही अर्पण केले जाते.

पौष पौर्णिमेचे महत्व-
हिंदू धर्माशी संबंधित मान्यतेनुसार पौष महिन्याला सूर्यदेवाचा महिना म्हणतात. या महिन्यात सूर्यदेवाची आराधना केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे म्हणतात. म्हणूनच पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांची पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात. पौष पौर्णिमेच्या दिवशी काशी, प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये गंगा स्नानाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या आणि दान केल्याने केवळ चंद्र देवताच नाही तर भगवान श्री हरीचीही कृपा होते. पौर्णिमा आणि अमावास्येला पूजा आणि दान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात.

पौष पौर्णिमा पूजा विधी-
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपवासाचे व्रत करावे. साधारणपणे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला प्रार्थना केली जाते, परंतु शहरांमध्ये हे शक्य नसेल तर गंगाजलाचे काही थेंब पाण्यात टाकून स्नान करू शकता. स्नानानंतर सूर्यमंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. स्नान करून भगवान मधुसूदनची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी कोणत्याही गरजू किंवा ब्राह्मणाला दान करणे शुभ मानले जाते. तीळ, गूळ, घोंगडी, कपडे दानधर्मातही देऊ शकता.

उपाय-
मित्रांनो हा उपाय आपल्याला या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे. हा उपाय करण्याआधी शक्य असल्यास अंघोळ करावी अन्यथा हात पाय धुतले तरीही चालेल. त्यांनतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करायला आपल्याला गाईचे तूप वापरायचे आहे आणि ते नसेल तर आपण तिळाचे तेल सुद्धा वापरू शकता. आता या दिव्यात जी वात वापरायची आहे ती लाल रंगाची असावी. यासाठी तुम्ही कापसाची वात कुंकवाने लाल करू शकता.

हा उपाय सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या घरात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करायची आहे आणि गाईच्या तुपाचा एक दिवा या ठिकाणी सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यांनतर लाल वातीचा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या प्रवेश द्वारावर उजव्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे. घरात प्रवेश करताना जी उजवी बाजू असेल त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय य मंत्राचा जप करत हा दिवा ठेवायचा आहे.

एक लक्षात ठेवा हा दिवा कधीही जमिनीवर ठेऊ नये. त्या खाली एखादं पात्र किंवा फुलांच्या पाकळ्या टाकल्या तरीही चालतील. त्यांनतर आपण घरात जी पूजा केली आहे त्या ठिकाणी येऊन माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू समोर बसून आपल्या मनातील इच्छा, अडचणी, समस्या त्या सर्व सांगून त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. या उपायाने नक्कीच तुम्हाला फरक जाणवू लागेल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment