आयुष्यामध्ये प्रत्येक स्त्री.. अशा पुरुषाची कामना करत असते.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आज आम्ही तुम्हाला विदुरजींनी सांगितलेल्या अशा महत्त्वाच्या गुणांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्याने व्यक्ती परिपूर्ण होऊ शकते आणि या जगामध्ये भरपूर मान-सन्मान मिळवू शकते. विदुरनीती मुळे लोक तुमचा नक्कीच आदर करतील. तुमच्या मतांचा आदर करतील. तुम्ही केलेल्या कामांची सर्वजण स्तुती तथा कौतुक करतील. एक काळ असा असेल की तुमच्या प्रत्येक शब्दात इतकी ताकद येईल की तुमचा शब्द लिलया झेलला जाईल.. तुमच्या सर्वात खालची किंवा क्रू’र असलेली व्यक्ती सुद्धा तुमचे शब्द खाली पडू देणार नाही. विदुरजींनी आपल्या धोरणांमध्ये मू र्ख, अहंकारी, अ त्या चा री आणि क्रू र लोकांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत.

याचबरोबर त्यांनी ज्ञानी तथा विद्वान माणसांची काही वैशिष्ट्येही देखील सांगितलेली आहेत. मूर्ख माणूस त्याच्या वागण्याने समाजात वारंवार अ’पमानित होत असतो आणि शहाणा माणूस त्याच्या वागण्या – बोलण्यातून आणि बुद्धिमत्तेने जगात प्रसिद्धी मिळवतो. त्यामुळे जीवनात मान-सन्मान मिळवायचा असेल तर आपण विदुरनीतीचे पालन आवर्जून केले पाहिजे. कोणी तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्नही करणार नाही आणि महिला सुद्धा तुम्हाला चांगला माणूस म्हणून ओळखतील. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते गुण आहेत, ज्यांच्या आधारे माणूस स्वतःच्या जीवनाचे कल्याण करू शकतो.

कपडे आणि उच्च राहणीमान – चांगल्या माणसाने सभ्य माणसा सारखे कपडे घालावे, सभ्य व्यक्तीसारखे दिसण्याचा प्रयत्न करावा, त्याने सै ता ना सारखे कपडे घालू नये. आजकाल फॅशनच्या नावाखाली मु र्ख लोक सै ता ना सारखे दिसण्यात धन्य मानतात. परंतु ते असे करून ते इतरांसाठी विनोदाचे पात्र बनतात.

कुणाला जास्त आग्रह करू नका – चांगल्या माणसाने इतरांपेक्षा जास्त आग्रह धरू नये. समोरची व्यक्ती तुमच्याशी वागायला किंवा बोलायला तयार नसेल तर जास्त आग्रह करू नका. जास्त आग्रह केल्याने तुम्ही तुमची किंमत कमी करून घेत आहात.

कुणाला अपमानित करू नका – चांगल्या माणसाने चुकूनही कोणाचा अपमान करू नये असे विदुरजींनी आपल्या नीती मध्ये सांगितले आहे. कोणी कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला तरी, कोणी कितीही शाप दिला तरी त्याने कोणाचाही अपमान करू नये. शांत राहूनच आपले मोठेपण सिद्ध केले पाहिजे. लहान असो वा मोठा, त्याच्याकडून काही चूक झाली तर रागावून त्याचा अपमान करू नका.

लक्ष देऊन ऐका – जर एखादी व्यक्ती आपले मत व्यक्त करत असेल किंवा कोणत्याही विषयावर ज्ञान देत असेल तर त्याचे पूर्ण ऐकून घ्यायला शिका. त्याचे बोलणे संपल्यानंतरच आपले मत व्यक्त करा. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका, हे चांगल्या माणसाचे लक्षण आहे.

स्वतःची स्तुती करू नका – मूर्ख माणसाला फक्त स्वतः बद्दल ऐकायला आवडते. त्याला फक्त स्वतःचा गौरव करायचा असतो, पण परिपूर्ण माणसाने स्वतःचा गौरव करू नये. आपल्या तोंडाने नव्हे तर आपल्या कामातून मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. सामान्य माणसा ला स्वतःची स्तुती ऐकून आनंद होतो. परंतु सर्वोत्तम माणूस स्वतःचे अवगुण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो स्वतःला सुधारू शकेल.

प्रशंसा – चांगल्या माणसाने इतरांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे. एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याची स्तुती नक्कीच करा. त्यांच्याकडून काम करण्याची प्रेरणा घ्या. समोरच्याला कधीही कमी लेखून त्याने केलेल्या कामाची थट्टा करू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment