बाप्पाला प्रिय असलेल्या या खास गोष्टी : ज्या बाप्पाला अर्पण केल्याने तुमची सारी विघ्नं क्षणार्धात होतील छू मंतर.!!

“गणपती बाप्पा मोरया”
नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो सुखकारक आणि विघ्नहर्ता असा आपला बाप्पा आहे. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद असतो त्या व्यक्तिच्या आयुष्यातील सारी संकटे बाप्पा दूर करतो. त्याच्या घरात रिद्धी, सिद्धी पाणी भरतात.

श्री गणेशाबद्दल असे मानले जाते की, बाप्पा जरी आपल्यावर रुसला तरी त्याला मनवने अगदी सोप्पे आहे. शास्त्रात काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत, ज्याद्वारे तुम्ही श्री गणेश यांना पटकन प्रसन्न करू शकता.

दुर्वा अर्पण करा – गणेशजीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज सकाळी स्नान केल्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर पाच दुर्वा अर्पण कराव्या. दुर्वा गणपतीच्या डोक्यावर ठेवाव्या. बाप्पाच्या पायावर दुर्वा वाहू नये.
दुर्वा अर्पण करताना या मंत्राचा जप करा..
‘इदं दुर्वादलं ऊं गं गणपतये नमः’

शमीची पाने – शास्त्रानुसार, शमी ही एकमेव अशी वनस्पती आहे ज्याच्या पूजेमुळे श्रीगणेश आणि श्री शनिदेव दोघेही प्रसन्न होतात. शमी वृक्षाची पाने गणरायाला खूप प्रिय आहेत. शमीची पाने नियमितपणे गणपतीला अर्पण केल्याने घरात धन, धान्य, कौटुंबिक सुखात भरभराट होते.

अक्षदा – गणपतीला प्रसन्न करण्यासाठी पवित्र अक्षदा अर्पण कराव्या. पवित्र अक्षदा म्हणजे न तुटलेले असे अखंड तांदूळ होय. अक्षदा कधीही कोरडया वाहू नये. त्या थोडे पाणी घालून ओल्या करून मग अर्पण कराव्या. अक्षदा वाहताना ह्या मंत्राचे उच्चारण करावे –
” इदं अक्षतम् ॐ गं गणपतये नमः”

लाल कुंकू – कुंकवाचा लाल रंग गजाननाला खूप आवडतो. गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी बाप्पाला आधी कुंकवाचा टिळा लावून मग स्वतः टिळा लावला पाहिजे. यामुळे गणेशाचे शुभ आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतात.

यामुळे, गणेशजी आर्थिक क्षेत्रातील अडचणी दूर करतात. गणेशजींना कुंकू अर्पण करताना
‘सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥
ओम गं गणपतये नमः’
या मंत्राचे उच्चारण करावे.

या उपायाने तुमच्या आयुष्यात कायम सकारात्मक परिणाम होतील. तुम्ही एक उत्तम आणि ऐश्वर्यसंपन्न जीवन जगणार.

मोदक – परशुरामजींच्या युद्धात गणेशजीचा एक दात तुटला होता. यामुळे, गणेशजींना कडकपदार्थ खाण्यास त्रास होतो, परंतु मोदक खूप नरम असतात जेणेकरून तोंडात टाकताच ते विरघळतात. म्हणूनच मोदक गणेशाला अत्यंत प्रिय आहे.

लाडू – लाडूचा भोग गणरायाला दिल्यास ते अतिशय प्रसन्न होतात. लाडूचे माधुर्य बाप्पा आपल्याही जीवनात घेऊन येतात. सर्व प्रकारच्या समस्या चुटकीसरशी निघुन जातात.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment