दिशा चक्र आणि वास्तुशास्त्र, गुरुकिल्ली दोष व उपाय : वास्तुशास्त्रात वास्तुपुरुषाचं महत्व काय असतं.??

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आज आम्ही तुम्हाला वास्तुपुरुष याबद्दल माहिती देणार आहोत. बऱ्याच ठिकाणी वास्तुपुरुष बद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. वास्तुपुरुष जमिनीखाली ठेवायचं की नाही ते जमिनीखाली ठेवलं तर चालत का?

असे बरेच प्रश्न सर्वांना वास्तुशास्त्रातील पडलेले असतीलच. आपण प्रत्येक जण घरात राहतो, वास्तुशास्त्र करतो, पूजा करतो. मित्रांनो आपण नवीन घर घेतलं किंवा जुने घर रीन्यूड केलं. तर वास्तुशांती करुन वास्तू पुरुष आपल्या घरामध्ये अग्नेय कोपऱ्यामध्ये जमिनीखाली पालथा ठेवावा.

आणि दीक्षेत (पुरावा) करावा. असं वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे वास्तुपुरुषाची आपल्या वास्तूवर कायम कृपा राहते. पण सध्याच्या काळामध्ये आपली घरे फ्लॅट जमिनीपासून उंचावर असतात. आपण खूप वरच्या मजल्यावर राहत असतो.

त्यामुळे वास्तु शांत करणारे आपले गुरुजी ब्राह्मण सल्ला देतात ती अशा उंचीवर घर असल्याने वास्तुपुरुषाची जी प्रतिमा आहे ती जमिनीखाली दीक्षेत करू नका. याचं कारण काय आहे तर ती अशी जमिनीखाली दीक्षेत करन तुम्ही दहाव्या किंवा बाराव्या मजल्यावर राहताय तर ती प्रतिमा हवेत राहते.

घर ग्राउंड लेव्हल ला असेल तर ठीक आहे असं सांगितलं जातं. नक्की काय आहे वास्तुपुरुष? जमिनीत ठेवायची पद्धत? नक्की काय काळजी घ्यायची आहे वास्तुपुरुष च्या संदर्भात? आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत. वास्तुपुरुष हे आपल्या वास्तूमध्ये आग्नेय दिशेमध्ये पालता दीक्षेत करायचा.

म्हणजे आपल्या संपूर्ण वास्तू चा विचार करता जे काही वास्तूचे अग्नेय दिशा असते. ती आग्नेय दिशा जरी तुमच्या बेडरूममध्ये आली असेल तरीसुद्धा चालेल. काही वेळा ही अग्नेय दिशा टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये येते त्यावेळी मात्र वास्तुपुरुष थोडासा पूर्व दिशेच्या अग्नेयाला किंवा दक्षिण दिशेच्या अग्नेयाला आपण जमिनीखाली दीक्षेत करू शकतो.

मित्रांनो एवढीच काळजी घ्यायची आहे पण आग्नेय दिशा विसरायची नाही आहे. वास्तु शास्त्राचा नियम सगळ्या वास्तूंना लागू पडतो. कारण वास्तुशास्त्र असं मानत की आपली वास्तू सुखी समृद्धी आणि आरोग्यदायी होण्यासाठी तसेच आपल्या वास्तूला सर्व प्रकारचे शुभाशीर्वाद प्राप्त होण्याबरोबरच कुठल्याही वाईट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी त्यामध्ये वास्तू शांत ही पूजा, वास्तुपुरुष दीक्षेत होन अत्यंत आवश्यक असतं.

मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे वास्तुपुरुष हा अग्नेय दिशेमध्ये का ठेवायचा व इतर दिशेमध्ये का ठेवायचा नाही? कारण या अग्नेय दिशेचे महत्व वास्तुपुरुष यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वस्तूचे नेहमी संरक्षण करण्याचं काम ते करतो.

कारण या दिशेमध्ये अग्नेय देवतेचा मान असतो म्हणजे नैसर्गिक अग्नी ऊर्जा ही त्या ठिकाणी असते. आणि शुक्र हा भरभराट, वैवाहिक, मुलाबाळांचे सुखं देणारा शुक्र या ग्रहाचे स्थान सुद्धा अग्नेय दिशेमध्ये असतं. अष्टलक्ष्मी पैकी धान्यलक्ष्मी स्थान देखिल अग्नेय दिशेमध्ये असतं.

यासाठी सोन्याचा केलेला वास्तुपुरुष त्याबरोबर पंचरत्न किंवा अगदी नवग्रह रत्न पूजा करून वास्तुशांती पूजन वेळ या दिशेत जमिनीखाली ठेवण्याचे नियम आहेत. परंतु या पूजेमध्ये ठेवलेली वास्तू पुरुषाची प्रतिमा ही सोन्याची नसते. सोन्याचं पाणी चढवलेलं असतं.

आपण सोन्याची एक लहान तार सुद्धा या प्रतिमेसोबत त्या अग्नेय दिशेमध्ये ठेवू शकतो. ही वास्तुपुरुषाची प्रतिमा औदुंबराच्या झाडापासून बनवलेल्या छोट्या लाकडी पेटी मध्ये ठेवून आणि मग ती पेटी ठेवायचे असते.

किंवा मातीचा आकार दिलेली एक पेटी असते त्यामध्ये ठेवली तरी चालेल.या सर्व गोष्टी जर आपल्याला मिळाली नाही तर जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तेवढ्या गोष्टी त्या वास्तु पुरूषासोबत त्या आग्नेय दिशेमध्ये दीक्षेत कराव्यात.

तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो वास्तुपुरुषाची स्थापना करतेवेळी त्याचं डोकं ईशान्य व पाय नैऋत्य दिशेकडे असावे. व ती पालती दीक्षेत करावी. या वास्तू पुरुषाची सदैव आपल्या वास्तूला कृपा मिळावी म्हणून दर अमावस्याला त्या वास्तुपुरुषाच्या जागेवर दहीभाताचा नैवेद्य दाखवून धूप अगरबत्ती दाखवून नमस्कार करावा.

आणि ओम वास्तू पुरूषाय नमः असा मंत्र म्हणायचा. या मंत्राचा उच्चार कमीत कमी तीन वेळा आणि वेळ असेल तर अकरा वेळा करायचा आहे. आपल्या घरात कोणतेही मंगल कार्य असेल त्यावेळी वास्तुपुरुषाच्या त्या अग्नी या दिशेला नैवेद्य दाखवायचा विसरू नका.

मित्रांनो आपण रोज सकाळी व संध्याकाळी पूजा करताना धूप व अगरबत्ती देवाला ओवाळतो त्यावेळी अग्नेय दिशेला पण धूप व अगरबत्ती दाखवायला विसरू नका. त्या वास्तु पुरुषाचा आशीर्वाद आपल्या वास्तूसाठी रोज घ्यावे.

तुम्हाला खूप चांगले अनुभव येताना निश्चित दिसतील. मित्रांनो तुम्ही दर अमावस्येला नैवेद्य दाखवता. शक्य असेल तर त्या दिवशी नदीमधील शेवाळ असतं ते घेऊन ही जागा जरा सारवून घ्यावी. यामुळे ती जागा शांत राहते. असंसुद्धा वास्तुशास्त्र मानत.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment