हे आहे पैशांचा पाऊस पाडणारे फुल.. दिसेल तिथून लगेच घरी घेऊन या.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपण भरपूर मेहनत करून देखील आपल्या घरात जर पैसा राहत नसेल कोणत्या ना कोणत्या उपयोगासाठी तो पैसा नष्ट होत असेल म्हणजेच काय एवढे परिश्रम करून देखील आपल्या घरात पैशाची चणचण निर्माण होते.

अशावेळेस आपण नक्की काय करावे असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. त्यावरच मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तो उपाय म्हणजे गोकर्ण फुल. निळा रंगाच्या गोकर्ण फुलांची वेल असते. किंवा पांढ-या रंगाच्या फुलांची देखील फुलाची वेल असते. गोकर्ण या फुलाचा आकार गाईच्या काना प्रमाणे असतो म्हणून त्याला गोकर्ण असे संबोधले जाते.

गोकर्णाची फुलेही आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत उपयोगी व फायदेशीर आहेत. ही गोकर्णाची फुले आपल्या शरीरातील र’क्त शुद्ध करून आपले शरीर निरोगी ठेवते. तांत्रिक दृष्ट्या देखील गोकर्णाच्या फुलाला अत्यंत फायदेशीर मांडले जाते. ज्यांच्या घरात जर पैसा टिकत नसेल, पैशाची चणचण भासत असेल, कितीही पैसा आला असेल तो घरात कमी पडत असेल तर आपणाला या झाडाच्या फुलाचा उपयोग होईल.

गोकर्णाच्या फुलांची वेल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपणाला शनिवारी संध्याकाळी जावयाचे आहे. पण लक्षात ठेवा निळ्या रंगाच्या गोकर्ण फुलांची वेल असावी. या गोकर्णाच्या फुलांच्या वेलीला अगरबत्ती दिवा लावायचा आहे व हात जोडून म्हणावयाचे आहे की, मी तुम्हाला उद्या सकाळी न्यायला येईल. तुम्हाला आमच्या घरी येऊन आमच्या घरात पैशाची भरभराट करावयाची आहे.

जर तुमच्या घरी काही आरोग्य विषयी तक्रार असतील तर त्या देखील तुम्ही सांगाव्यात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला सकाळी उठून स्ना’न करायचे आहे व स्ना’न झाल्यानंतर गोकर्णा च्या वेलीपाशी जाऊन त्या वेलीची काही मुळे उपटून तसेच दोन-चार फुले देखील घेऊन घरात यावयाचे आहे व ती मुळे आपणाला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत. गोकर्णाच्या फुलांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.

जी मुळे आणलेली आहेत ती मुळे आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून ती तिजोरीत गल्ल्याच्या ठिकाणी किंवा जिथे आपण कोठे पैसा ठेवतो तिथे ठेवायचे आहे. दुसर्‍या दिवशी सुकलेली फुले देखील आपण तिजोरीमध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे. जोपर्यंत आपल्या घरातील गोकर्णाची फुले व मुळे आहेत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

आपल्या घरात पैशाची चणचण भासणार नाही. खर्चाला आळा बसेल. उत्पन्नात आपल्या वाढ निर्माण होईल. असा हा मी सांगितलेला उपाय तुम्ही आपल्या घरी नक्की करून पहा. भरपूर चांगले यश आपणाला लागेल.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment