हे आहेत जन्म कुंडलीतील असे काही योग : जे बनवतात एखाद्या व्यक्तीला धनाढ्य आणि रईसजादा..!!

मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जन्मकुंडलीतील अशा योगांबद्दल जे कुणालाही बनवू शकतात धनाढ्य आणि रईसजादा..!!!

ज्योतिषशास्त्रानुसार,कोणत्याही व्यक्तीची कुंडली पाहुन हे समजू शकते की त्याच्याकडे किती संपत्ती असेल.

आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या स्थानामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. जेव्हा कुंडलीत शुभ योग असतो तेव्हा त्या व्यक्तीला अनेक फायदे देणारे परिणाम मिळतात, जेव्हा अशुभ योग तयार होतो तेव्हा अनेक समस्या उद्भवतात.

जर आपणास देखील थोडे ज्योतिष माहित असेल तर आपण आपल्या स्वत:च्या जन्म कुंडलीतील धनवान होण्याचे योग पाहू शकता. काही प्रमुख धनदायी योगांबद्दल जाणून घ्या.

जर जन्मकुंडलीच्या दुसर्‍या स्थानी लाभार्थी ग्रह असेल तर त्या व्यक्तीकडे अफाट धनसंपत्ती असते.

जन्मकुंडलीच्या दुसर्‍या घरात शुभ ग्रह दिसू लागले तरी संपत्तीचे योग तयार होतात.

दुसऱ्या स्थानातील स्वामी म्हणजे द्वितीयेष याला धनेश मानले जाते यावर शुभ ग्रहाची दृष्टी असली तर त्यामुळे देखिल आपल्याला पैशांची कमतरता भासत नाही.

दुसऱ्या स्थानातील स्वामी म्हणजे द्वितीयेष बरोबर जर शुभ ग्रह बसलेला असेल तेव्हाही व्यक्तीकडे खुप पैसे असतात.

जेव्हा गुरु कुंडलीच्या मध्यभागी स्थित असेल किंवा लाभ भावात (अकरावे घर) स्थित असेल तर त्या व्यक्तीमध्ये पैशाची कमतरता नसते.

जर लग्नेश म्हणजेच लग्न भावाचा स्वामी ज्या ठिकाणी बसलेला असेल त्यापासून दुसऱ्या भावाचा स्वामी उच्चतम असून केंद्रस्थानी विराजमान असेल किंवा धनेश आणि लग्नेश उच्च राशीत असतील तर त्या व्यक्तीकडे भरपुर पैसे असतात.

चंद्र आणि गुरू ग्रह कोणत्याही शुभ घरात संयोगाने असणे आवश्यक आहे. जर गुरू धनेश असून मंगळासह असेल किंवा चंद्र आणि मंगळ दोन्ही केंद्रस्थानी असतील तर त्या व्यक्तीकडे वडिलोपार्जित संपत्ती असते.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment