लिं’ग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय.? ते टाळण्यासाठी काय करावं.?

लिं’ग फ्रॅक्चर ही सुद्धा पुरुषांमध्ये आढळणारी पण फारसं न बोललं जाणारी समस्या आहे. साध्या मराठीत सांगायचं झालं तर लिं’ग फ्रॅक्चर होणं. से’क्स करताना लिंग यो’नीत जाण्याऐवजी स्त्रीच्या पायावर किंवा गु’प्तांगावर आदळलं तर लिं’ग फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना केली नाही तर दीर्घकाळ शारीरिक आणि लैं’गिक क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

से’क्स करताना स्त्री पुरुषाच्या शरीरावर असेल किंवा अनै’सर्गिक से’क्स करत असाल तर लिं’ग फ्रॅक्चर होण्याची शक्यता बळावते. हस्तमै’थुन करताना किंवा ताठरलेल्या लिं’गावर एखादी वस्तू पडली तर लिं’ग फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता आहे.

लिं’ग फ्रॅक्चर होणं ही पुरुषांच्या ज’ननेंद्रियाला होणारा मोठा आघात आहे. से’क्स करताना लिं’ग फ्रॅक्चर होण्याच्या घटना सर्वांत जास्त प्रमाणात होतात. लिं’ग कुठे आदळलं तर ताठरलेल्या लिं’गावर दाब येतो आणि त्यामुळे Tunica Albugenia हा भाग फाटतो.

लिं’ग फ्रॅक्चर झाल्यावर जर तातडीने उपचार घेतले नाहीत तर मोठी शारीरिक समस्या उद्भवू शकते आणि त्याचा लैं’गिक आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. लिं’ग फ्रॅक्चर होण्याची समस्या से’क्स करतानाच होते. एका संशोधनात 57.2% पुरुषांनी से’क्स करतानाच लिं’ग फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं.

विशेषत: से’क्स करताना स्त्री पुरुषाच्या शरीरावर असेल किंवा अनै’सर्गिंक सं’भोग करताना लिं’ग फ्रॅक्चर होतं. हस्तमै’थुन करतानासुद्धा इजा होऊ शकते किंवा ताठरलेल्या लिंगावर एखादी वस्तू पडली तरीसुद्धा लिं’ग फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.

ही इजा अर्थातच पुरुषांना होते. मध्यमवयीन पुरुषांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. विशेषत: 30 ते 50 या वयोगटात ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. विषमलिं’गी पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. समलिं’गी पुरुषांमध्येही समस्या आढळते.

हे प्रमाण 1.8 % आहे. त्यामुळे लैं’गिक आकर्षण कोणाकडे आहे हा इथे मुद्दा नाही. एक संशोधनानुसर तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा वीकेंडला या घटना होण्याचं प्रमाण वाढतं. लिं’ग फ्रॅक्चर झाल्यावर ज’ननेंद्रियात प्रचंड वेदना होतात, तिथे जखमाही होण्याची शक्यता असते.

लिं’गाचा आकार मोडल्यासारखा असतो. से’क्सॉलॉजिस्ट डॉ. प्रसन्न गद्रे याविषयी अधिक माहिती देताना सांगतात, “लिं’गाला हाड नसतं, मग ते फ्रॅक्चर होऊ शकतं का? तर नक्कीच शक्य आहे. लिं’गावर कोणत्याही प्रकार आघात झाला किंवा अपघात झाला तर त्याला ढिलं पडलेल्या पे’निसचं फ्रॅक्चर असं म्हणतात.

“ताठर झालेलं फ्रॅक्चर होण्याची कारणं असतात. झोपल्यावर स्वप्नावस्थेत असताना लिं’ग ताठरलं आणि अचानक कुशीवर वळलं तरी लिं’गाला फ्रॅक्चर होऊ शकतं. हस्तमै’थुन करताना ते कुठे घुसवण्याची क्रिया केली तर लिंग फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.”

“से’क्स करताना अनेकदा यो’नीमार्ग आकुंचन पावतो, त्यावेळी लिं’ग बळजबरीने आत घालण्याचा प्रयत्न केल्यास हे फ्रॅक्चर होऊ शकतं. अनल से’क्स करतानाही अशाप्रकारे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते,” गद्रे पुढे म्हणतात. निदान कसं होतं?

लिं’ग फ्रॅक्चरचं निदान करण्यासाठी नेहमीच्या पद्धती वापरतात. त्यात अल्ट्रासाऊंडने या रोगाचं निदान करता येतं. पण ते करताना तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते. त्यामुळे ही पद्धत योग्य आहे की नाही याबाबत नेहमी वाद होतात. फ्रॅक्चर झाल्यानंतर सर्जरी हा अतिशय चांगला उपाय आहे. CT स्कॅनच्या माध्यमातून सर्जरीची योग्य जागा ओळखता येते.

लिं’ग फ्रॅक्चर झाल्यावर तातडीने काय उपाययोजना केली पाहिजे याविषयी बोलताना डॉ.गद्रे सांगतात, “दुर्दैवाने असं काही झाल्यास तातडीने हॉस्पिटल गाठावं. कारण ही सुद्धा जखम आहे. प्रथमोपचार म्हणून अजिबात जास्त हालचाल करू नये. फ्रॅक्चर झाल्याचं लक्षात येताच मूत्र शल्यविशारदाकडे जाण्याआधी त्या जागेवर बर्फ ठेवावा.

पॅडिंग करणं हाही प्रथमोपचाराचा महत्त्वाचा टप्पा आहे. घरात सॅनिटरी पॅड असल्यास तो लावावा, किंवा लंगोटीचा आधार द्यावा. “डोकं खाली आणि पाय वर करायचे. या उपचार पद्धतीला RICE (Relaxation, Icing, Cushion Elevation) असं म्हणतात.

तातडीने सर्जरी करणं हा यावरचा महत्त्वाचा उपाय आहे.” सर्जरी आणि त्यानंतर लिं’ग फ्रॅक्चर झाल्यामुळे लैं’गिक जीवनावर परिणाम होतो. ज्यांना ही इजा होऊन गेली आहे त्यांना बराच काळ हा परिणाम जाणवतो. काहींना ऑपरेशन झाल्यानंतर काही काळ हा परिणाम जाणवतो. मात्र बहुतांश रुग्णांमध्ये हा परिणाम दीर्घकाळ पहायला मिळतो.

लिं’ग फ्रॅक्चर झाल्यानंतर से’क्स करताना अनेकांना नैराश्य येतं, दडपण येतं. ही इजा होण्याच्या भीतीने से’क्स करण्याच्या पद्धतीतही मोठा फरक आढळतो. त्यामुळे सर्जरी झाल्यानंतर अनेकांना समुपदेशन करावं लागतं.

छोट्या छोट्या गाठी येणं, लिं’गाचा आकार बदलणं, लिं’ग न ताठरणं, वेदना, सूज, मूत्रविसर्जनात समस्या असे अनेक आजार उद्भवू शकतात. सर्जरी झाल्यानंतर लिं’गाचा आकार बदलण्याचीही शक्यता असते. लिं’ग ताठरला की वेदना होतात, तसंच लिं’ग ताठरल्यावर त्याची लांबी आधीपेक्षाही कमी होण्याचीही शक्यता असते.

त्यामुळे सर्जरी करण्याधी डॉक्टरांनी रुग्णांबरोबर या सर्व गुंतागुंतीची चर्चा करावी. सर्जरीनंतर काय काळजी घ्यायची याची रुग्णांना योग्य माहिती मिळायला हवी. सर्जरीनंतर कॅथेटर सगळ्यात महत्त्वाचा आहे हे रुग्णांना सांगायला हवं.

सर्जरीनंतर किमान चार आठवडे कॅथेटर ठेवावा अशी सूचना देणं अत्यावश्यक आहे. सर्जरीनंतर झालेली जखम स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. जखमेच्या आसपासचे केस काढण्याचा प्रयत्न करू नये..

Leave a Comment