नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात आणा एक वस्तू : वर्षभर घरात पैसा कमी पडणार नाही.!!!

.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्र-मैत्रिणींनो, आपल्यापैकी बरेच जण नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक वस्तू घरात आणत असतात. त्यामध्ये कुणी नवनवीन वस्तू तर कोणी देवी-देवतांचे तर कोणी महापुरुषांचे फोटो व मुर्त्या आणत असतात. पण मित्रांनो वर्षाच्या सुरुवातीला आपण घरात जर काही शुभ वस्तू आणल्या तर त्याचा फायदा आपल्याला वर्षभर होत राहतो.

त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात होत असताना आपण नेमक्या कोणत्या शुभ वस्तू आणायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरात पैशांची भरभराट होईल घरात सुख समाधान नांदेल आणि घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. चला तर मग पाहुयात कोणत्या आहेत ह्या शुभ वस्तू तिच्यामुळे नवीन वर्षातच आपले भाग्य उजळून येईल.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात आणायची पहिली वस्तू आहे चांदीची गणेशाची किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती. मित्रांनो नवीन वर्षात जर आपण घरामध्ये श्री गणेशाची व लक्ष्मीमातेची चांदीची मूर्ती खरेदी करून आणली तर आपले भाग्य बदलते आणि आपल्या घरामध्ये पैशांची व सुखशांती ची भरभराट होऊ लागते.

पण ही मूर्ती आणल्यानंतर आपल्याला ती जिथे आपण घरातील पैसा व दाग-दागिने ठेवत असतो त्या तिजोरीच्या कपाटांमध्ये ठेवायचे आहे. यामुळे आपल्या वैभवात वाढ होत राहते व पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतात.मित्रांनो त्याचबरोबर पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्याला या नवीन वर्षात घरांमध्ये आणायची आहे आणि ती आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या वरील बाजूस लावायची आहे.

यामुळे आपल्या घरांमध्ये येणारे सर्व संकटे दूर होतील व त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. आणि त्याच बरोबर आपल्या घरातील व्यक्तींसोबत अपघात घडत असतील व घरांमध्ये वारंवार वादविवाद होत असतील तर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावावी. आपल्या घरावर येणाऱ्या संकटांना पासून आपले रक्षण होईल.

त्याचबरोबर पुढील वस्तू आहे माता लक्ष्मीची पावले, ही माता लक्ष्मीची पावले आपल्याला अगदी सहज कुठेही मिळतात. ते आपण आणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूस लावावे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते व आपल्या घरातील धन संपत्तीत वाढ होत राहते आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो पैसा विनाकारण खर्च होत नाही.

परंतु ही पावले लावताना ती घरात आत येणारी असावीत बाहेर जाणारी नसावीत. या नंतरची वस्तू आहे कुबेर देवतेची मूर्ती.
मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे काही धन आहे त्याचे अधिपती देवता हे कुबेर देवच आहेत. अशीही कुबेराची मूर्ती जर आपण आपल्या घरामध्ये आणून ती स्थापित करून तिची नित्य नियमाने पुजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

या कुबेर देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण आपल्या देवघरात करू शकतो किंवा ज्या ठिकाणी आपण घरातील धनसंपत्ती व दागदागिने ठेवत असतो त्या तिजोरीमध्ये केली तरी ही चालेल. माता लक्ष्मी प्रमाणे या कुबेर देवतेची ही आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या घरात पैसा येऊ लागेल आणि तो टिकून सुद्धा राहील व आपल्या पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो वरील वस्तूंप्रमाणे धातूचा कासव, धातूचा कासव असलेली अंगठी, बुद्ध देवतेची मूर्ती, या वस्तू सुद्धा आपण नवीन वर्षात आपल्या घरामध्ये आणू शकतो की ज्यामुळे आपल्या घरात सुख समाधान राहील घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्तोत्रांच्या मदतीने एकत्रित केली आहे त्यामुळे कोणीही या माहितीचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच विविध लेखन विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment