Monday, May 29, 2023
Homeबॉलिवूडसध्याच्या यंग जनरेशन चा फर्स्ट क्रश असलेली ही साऊथ ची अभिनेत्री करतेय...

सध्याच्या यंग जनरेशन चा फर्स्ट क्रश असलेली ही साऊथ ची अभिनेत्री करतेय बॉलीवूड मध्ये दमदार एंट्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्माइली रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहे.

नुकतेच रश्मिका मंदानाने या चित्रपटाच्या कामाला सुरूवात केली आहे. रश्मिका मंदाना हिने नुकतेच तिच्या बालपणीचा सांस्कृतिक कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कोणत्या गाण्यावर ती डान्स करते आहे, हे ओळखायला सांगितले आहे.

तिने एक क्लू दिला आहे. हे गाणे २००४ / २००५ चे आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने इंस्टाग्रामवर तिचा सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा फोटो शेअर करत तिने मिशन मजनू चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केल्याचे सांगितले होते.

या फोटोत तिच्या आणि सिद्धार्थच्या हातात स्क्रीप्ट पहायला मिळते. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, अहहह.. माझ्या टीमला जॉइन करण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. चला, तर मिशनला सुरूवात करूयात.
मिशन मजनू, ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन ‘मिशन मजनू’ हा चित्रपट तयार करणार आहे.या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले.

परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स