श्री गणेशाची मूर्ती कशी असावी.? बाप्पांना घरी आणण्यापूर्वी नक्की पहा.!!

मित्रांनो श्रावण महिना संपला. श्रावणाचा शेवटचा दिवस म्हणजे पोळा. पोळा संपला की इतर सणांना सुरुवात होते. पोळा झाला की लगेच हरतालिका, गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी असे एकामागून एक सण येतात.

म्हणतात ना पोळा करी सण गोळा. आता श्रावण संपला आहे. सर्वांना वेड लागले आहे गणपती बाप्पांच्या आगमनाचे. सर्वजण आतुरतेने गणपती बाप्पाची वाट बघत आहेत.

सगळेजण गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करत आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती. आपण मूर्ती आणायला जाताना झी मूर्ती सर्वात सुंदर व आकर्षक असते ती मूर्ती आपण निवडतो.

बाप्पांची मूर्ती आणताना मूर्तीमध्ये नेमके काय पहावे? कशा प्रकारे मूर्ती घरात आणावी? बाप्पांची मूर्ती घेताना ती दहा इंचा पासून ते एक फुटापर्यंत असावी. असे शास्त्रात नाही पण मूर्ती लहान असली ती उचलायला सोपे जाते.

व आपल्या घरी डेकोरेशन मध्ये खूपच सुंदर दिसते म्हणून शक्यतो दहा इंच ते एक फुटापर्यंत गणपती बाप्पांची मूर्ती असावी. दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पांची मुर्ती नेहमी शाडू मातीची घ्यावी.

यात पर्यावरणाचा ही भाग येतो. शाडू मातीची मूर्ती असल्यास तिचे विसर्जन केल्यावर मूर्ती पाण्यात लवकर वितळते. जर प्लास्टर ची मूर्ती असेल तर ती पाण्यात लवकर विरघळत नाही.

विसर्जन नंतर दोन तीन दिवसानंतर आपण जाऊन पाहू शकता कि गणपती बाप्पांचे किती हाल झाले ते आपल्याला बघायला मिळते. खंडित झालेल्या व तुटलेल्या मुर्त्या आपल्याला दिसायला मिळतात.

जर आपल्या बाप्पाचे विसर्जन चांगल्या रीतीने व्हावे असे वाटत असेल तर शाडू मातीची मूर्ती घ्यावी. प्लास्टर च्या मूर्तीमुळे नदीचे व तलावाचे पाणी दूषित होते. त्यात विषारी घटक मिसळतात. व शाडू मातीची मूर्ती बसवल्यास आपण पर्यावरणाचेही रक्षण करतो.

गणपती बाप्पांची मूर्ती आणताना शांत, सात्विक चेहऱ्याची, तलिरदार डोळ्यांची व आरामात बसलेली मूर्ती आणावी. आजकाल बाजारात मूर्ती आणताना मूर्तींचा विविध आकार व विविध प्रकार पाहायला मिळतो.

गरुडा वर बसलेले किंवा मोदकावर वर बसलेले बाप्पा आणू नये. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून येतात. तर त्यांना आरामात बसू द्यावे. छान पैकी पाटावर किंवा सिंहासनावर आरामात बसलेले गणपती बाप्पा आणावेत. मूर्ती बसलेल्या स्थितीतच असावी.

गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती सर्व बाजूंनी व्यवस्थित बघून आणावित. मूर्तीला कोठे तडा तर नाही ना सर्व ठिकाणी बघून मूर्ती नीट असेल तरच घरी आ. मुर्तीचे रंगकाम,डोळ्याचे आकार व्यवस्थीत आहे का ते पहावे मगच मूर्ती घरी आणावी.

आज-काल विविध प्रकारच्या मूर्ती बाजारात दिसतात. तसेच गणपती बाप्पा महादेव व माता पार्वती यांच्यामध्ये बसलेले दिसतात. ती मुर्ती खूपच सुंदर दिसते पण अशी मूर्ती घरात आणू नये. कारण आपण महादेवांचे व पार्वतीचे पूजन लिंगा मध्येच करतो.

तर गणपतीचे पूजन मूर्ती स्वरूपात करतो. त्याशिवाय दहा किंवा अकरा दिवसात गणपती बाप्पांचे विसर्जन करतो. त्यासोबतच महादेव व पार्वती चे विसर्जन करावे लागते. म्हणून मूर्ती आणताना ती फक्त बाप्पांची मूर्ती आणावी.

इतर देवी देवता सोबत आणू नये. त्याशिवाय मुकुट नसलेला गणपती कधी आणू नये. कारण बाप्पांचा मुकुट हा त्यांचा दागिना आहे. आणि जरी आपण मुकुट नसलेली गणपती घरी आणली तर बाजारात छान-छान मुकुट विकत मिळतात तो मुकुट आणून बाप्पांना घालावित.

आणि शेवटची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा चे वाहन उंदीर नसलेली मूर्ती आणू नये. कारण जर वाहन नसेल तर ते कशाला येतील. म्हणून मूर्ती आणताना छोटासा उंदीर गणपती बाप्पांच्या पायी नक्की असावा. मूर्तीच्या पायाशी उंदीर नसेल तर तो आणू नये.

मूर्ती घरी आणताना कशी आणावी?
आपण मूर्ती बुक करून आलेला असतो व आपल्याला मूर्ती ची साईज माहीत असते. त्या हिशोबात मोठे ताट बरोबर घ्यावे. त्यावर एक लाल आसन टाकावे. आसनावर थोडेसे तांदूळ टाकावे.

व त्या अस्नावर बाप्पांची मूर्ती ठेऊन, बाप्पांच्या अंगावर लाल कापड टाकून घरी आणावे. घरी आणताना बाप्पांचा चेहरा आपल्याकडे असावा. समोर बघताना नसावा.

सोबत एक लहान मुलगा आपल्या सोबत घेऊन जावा व एखादी लहान घंटी किंवा ताट वाजवत घरी आणावे. दारात आल्यानंतर बाप्पांचे तोंड दाराकडे करावे. ज्यांनी मूर्ती हातात घेतली आहे त्यांचे पाय दूध व पाण्याने धुवावे. त्यांना गंध लावावे.

व गणपती बाप्पांचे पूजन करावे. पाणी ओवाळून टाकावे व त्यानंतर बापांना घरात आणावे. बाप्पा घरात येण्यापूर्वीच चौरंगावर आसन टाकून त्यावर तांदूळ टाकून स्वस्तिक काढावे.

त्यावर मधोमध एक रुपया ठेवावा व त्यावर बाप्पांची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर बाप्पांना जानवे घालावे व बाप्पांची पूजन करावे. धूप व दीप दाखवावा. व प्रसाद दाखवावा. अशाप्रकारे चित्ताने व आनंदाने बाप्पांचे घरात स्वागत करावे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारित एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment