Friday, December 8, 2023
Homeअध्यात्म14 सप्टेंबर मोठा मंगळवार : करा स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळेस...

14 सप्टेंबर मोठा मंगळवार : करा स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो भाग्य म्हणजेच नशीब, हे आपल्याला काही वेळा साथ देत नसते आणि हेच नशीब साथ न दिल्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या किंवा दोष निर्माण होतात. त्यामुळे ह्या नशिबाची साथ हवी असेल तर बरेच प्रभावशाली उपाय वर्णिलेले आहेत आणि हे उपाय केल्यास नशिबाची साथ मिळू लागते, याशिवाय आपण केलेले प्रत्येक देवाच्या सेवेचे जलद गतीने फलप्राप्ती होण्यास मदत होईल.

त्यामुळे आपणही श्री स्वामीं समर्थाचे सेवेकरी आहात आणि आपण रोज स्वामींची सेवा करत असाल, तर तुम्ही ही सेवा नक्कीच केली पाहिजे.हा चमत्कारिक उपाय म्हणजे, तुम्हाला स्वामी समर्थांची आणि श्री गणपती बाप्पांची एक विशेष सेवा करायची आहे.

तुम्हाला या सेवेमध्ये फक्त एका मंत्राचा जप फक्त 21 वेळेस बोलायचं आहे. आज गणपती विसर्जनाच्या पाचवा दिवस आहे, म्हणजे पाचव्या दिवसाचे गणपतीचे विसर्जन आजच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत गणपती घरी आहेत, तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज तुम्हाला गणपतीच्या एका विशेष त्याचा जप करायचा आहे.

तसेच हा चमत्कारिक मंत्राचा जप तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष, तसेच लहान मुले कोणीही करू शकता. मात्र हा उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला हा जप करायचा आहे. या सेवेसाठी तुम्हाला आजच्या म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला आपले हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग देवघरासमोर बसायचा आहे.

मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावावा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री गणपती बाप्पाना आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना आपल्याला कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी आणि आरोग्यासाठी याशिवाय अडचणी किंवा समस्या दूर करण्यासाठी करायची आहे.

मग ही प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे,

” श्री विघ्नहर्ताय नमः”
“श्री विघ्नहर्ताय नमः”

हा मंत्र आहे. हा श्री गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी आणि खूप शक्तिशाली तसेच चमत्कारी असा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला फक्त 21 वेळेस बोलायचा आहे.मात्र हा मंत्र जपाचे काही नियम आहेत.ते म्हणजे, हा मंत्र तुम्हाला 21 वेळा करायचा आहे. 21 पेक्षा कमी किंवा 21 पेक्षा जास्त वेळा या मंत्राचा जप करू नये.

त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने आणि विश्वासाने ही सेवा करावी. नक्कीच तुम्हाला या सेवेची फलप्राप्ती होईल. मात्र हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने केला पाहिजे. गणपती बाप्पावर आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, मनोभावाने हा मंत्र बोलायचा आहे.

या उपायामुळे तुमच्या सर्व मनोकामना आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या ते दूर करतील.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स