अखेर मौन संपलं.. रिंकू राजगुरू बोलली रिलेशनशिप स्टेटस बद्दल..

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या रिंकूला या चित्रपटानं तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.

सोशल मीडियावर रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. सैराटमध्ये बिनधास्त ‘आर्ची’ची भूमिका साकारणाऱ्या आणि बेधडकपणे परश्याला आय लव्ह यू बोलणाऱ्या रिंकूच्या खऱ्या आयुष्यातील बॉयफ्रेंड बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशात आता एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना रिंकूनं आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला.

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि ती अनेकदा लाइव्ह किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते.

नुकतंच रिंकूनं इन्स्टाग्रामवर #AskMeAnything हे सेशन घेतलं होतं. ज्यात तिनं चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. या सेशनमध्ये चाहत्यांनी रिंकूला तिचा आवडला पदार्थ, आगामी चित्रपट, आवडतं ठिकाण असे वेगवेगळे प्रश्न विचारले. पण एका चाहत्यांनं तिला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल प्रश्न विचारला.

रिंकू राजगुरूच्या #AskMeAnything मध्ये एका चाहत्यानं तिला ‘तुझा बॉयफ्रेंड आहे का?’ असा प्रश्न विचारला आणि विशेष म्हणजे रिंकूनं त्याच्या या प्रश्नाचं उत्तरही दिलं.

रिंकून या प्रश्नाचं उत्तर देताना ‘No’ म्हणजे नाही असं म्हटलं आहे. म्हणजे आर्चीच्या खऱ्या आयुष्यातला परश्या अद्याप तिला भेटलेला नाही आणि ती सिंगल आहे. रिंकूची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ‘छूमंतर’ या मराठी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण लंडनमध्ये झालं असून सिनेमात प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

याशिवाय नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ सिनेमातही रिंकू दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे खुशबू सिन्हा दिग्दर्शित ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपटही आहे.

Leave a Comment