Tuesday, February 27, 2024
Homeराशी भविष्यतुमच्या शरिरावर असलेले तिळ दर्शवितात, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे चढ उतार

तुमच्या शरिरावर असलेले तिळ दर्शवितात, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे चढ उतार

आपल्या भारतीय संस्कृतीत शरीरावर तिळ आढळून येणे खूप शुभ मानले जाते, परंतु अट अशी आहे की शरिराच्या कोणत्या भागावर तो तिळ आहे, प्रत्येक मानवी शरीरावर एक तरी तिळ असतो, परंतु काही तिळ केवळ आपले नशिब उघडतात आणि काही त्याचे प्रभावी परिणाम दर्शवतात.

जर तुमच्या कपाळावर डाव्या बाजुला तिळ असेल तर तुमचं जिवन निराशने भरलेलं असू शकते. तुमच्या कडे पैसा कधीच टिकणार नाही.

जर तुमच्या उजव्या डोळ्यात तिळ असेल तर तुम्ही खूप उच्च विचारसरणीचे आहात . जर तुमच्या डाव्या डोळ्यामध्ये तिळ असेल तर तुम्ही निगेटिव्ह विचारांचे आहात असा त्याचा अर्थ होतो . आणि मित्रांनो ज्या लोकांच्या ओठांच्या वरच्या भागात तीळ असतो त्या व्यक्ती प्रेमळ असतात . परंतु ज्या लोकांच्या ओठांच्या खालच्या बाजूला तिळ असतो ती लोक दुर्दैवाने दारिद्री असतात .

जर आपल्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला तिळ असेल तर अशी व्यक्ती सुंदर आणि भाग्यवान आहे असे समजावे, त्या व्यक्तीला ला आयुष्यात अपार यश मिळते, त्यांच्या विवाहित जीवनात कोणताही अडथळा येत नाही आणि अशा व्यक्तींना आपल्या मुलांकडून अतिशय सुख मिळते.

जर एखाद्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला तिळ असेल तर ही व्यक्ती जोडीदाराच्या प्रेमात संपूर्ण आयुष्य जगते, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही, त्यांनी आपल्या मेहनतीने समाजात एक उच्च स्थान प्राप्त केलेले दिसून येते. .

ज्या व्यक्तींच्या कानावर तिळ असतो ते दीर्घायुषी असतात. तसेच स्त्री – पुरुष सज्जन असल्याचे संकेत सुद्धा हे तिळ देतात.

मित्रांनो नाकावरील तिळ असलेली व्यक्ती प्रतिभासंपन्न व सुखी असतात व त्या प्रकारातील स्त्रियांच्या नाकावरील तिळ हा सौभाग्यशाली असल्याचे सूचक आहे . मित्रांनो डाव्या दंडावर तिळ असणारी व्यक्ती भांडखोर असते तर उजव्या दंडावर तिळ असणारी व्यक्ती प्रतिष्ठित व सर्वत्र आदर असणारी व्यक्ती असते .

उजव्या हातावरील तिळ असणारी व्यक्ती बलवान व धनवान असतात व डाव्या हातावर तिळ असलेल्या व्यक्ती खर्चीक असतात . तर मित्रांनो तिळ फक्त सौंदर्य वाढवतात असं नाही तर आपल्या आयुष्याचे आपल्याला संकेत देत असतात आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे त्याचं सुचत देत असतात .

जर एखाद्याच्या ओठांवर तिळ असेल तर ती व्यक्ती त्याच्या कामाच्या कौशल्यांसाठी ओळखली जाते, ती व्यक्ती पैसा संपत्ती याने परिपूर्ण असते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यातील अशा गोष्टींमध्ये किंवा व्यवसायात भाग घेते ज्यामध्ये त्याला अधिक नफा होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स