घरात येथे लटकवा 1 हळकुंड : विघ्न, अडचणी होतील दूर, गरीबी निघून जाईल..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, काही घरांमध्ये असे पाहायला मिळते कि तिथे कायम रोगराई असते. घरातलं कोणी ना कोणी नेहमी आजारी पडत. कोणत्याही कार्याला यश येत नाही. अगदी कितीही तुम्ही प्रयत्न करा सतत अपयश तुमच्या पदरी पडतं.

घरामध्ये दारिद्र्य आणि गरीबी कायम वास करतात. शेती जमिनीमध्ये चांगलं पीक येत नाही. मूलबाळ एवढे शिक्षण घेतलेले असतात. एवढी बुद्धि प्रखर असते तरीसुद्धा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अपयश येतं. नोकरी मिळत नाही. अशा वेळी माणूस पुरता भांबावून जातो.

आणि या अडचणीतून कसे निघायचं हेच त्याला कळत नाही. मित्रांनो अशावेळी ज्योतिष शास्त्र हिंदू धर्म शास्त्र आपल्या मदतीला येऊ शकत.या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा. हा मार्ग आहे गरिबीतून बाहेर पडण्याचा.

मित्रांनो घरातून दरिद्र्या गरीबी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पहिला उपाय आहे अन्नदान. अनेक जण विचार करतील कि आम्ही स्वतः गरीब आहोत आमच्याकडे स्वतःकडेच पैसा नाही आहे अनुदान कस करावं.

मित्रांनो आपण आपल्या क्षमतेनुसार जितकं जमेल तितकं अन्नदान गरिबांना नक्की करा. असे असंख्य व्यक्ती आहेत की ज्यांना दोन वेळचं खायला सुद्धा मिळत नाही. अनेक अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम आपल्याला दिसून येतील. ज्या ठिकाणी आपण अन्नदान सारखं पुण्य काम करू शकता.

अन्नदान करणारा जो मनुष्य असतो त्याला अन्नग्रहण करणाऱ्या मनुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या व्यक्ती तुमच्या हातचं अन्न खातात. त्या व्यक्ती संतुष्ट होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि या आशीर्वादाच्या बळावर संपूर्ण घरातील दोष दूर होऊ शकतात. सणावाराला अन्नदान करत चला.

दुसरा उपाय आहे तो हळद आणि तांदूळ याचा उपाय. हळदीचा वापर करण्याऐवजी आपण हळकुंडाने हळद तयार करा. थोडीशी हळद घ्यायचे आहे. थोडीशी अक्षदा घ्यायचे आहे. म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे. या अक्षतांचा हिंदू धर्मात खूप मोठं महत्त्व आहे.

असेच थोडेसे अक्षद म्हणजे न तुटलेले तांदूळ हळद एकत्र करून त्याला पाण्यात आपण कालवायचा आहे. मिक्‍सरच्या साह्याने सुद्धा तुम्ही याचा घोळ बनवू शकता. आणि त्या नंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण स्वस्तिकाचे चिन्ह रेखाटाव या हळदी आणि तांदळाच्या मिश्रणाने.

कारण प्रवेशद्वारातूनच देवी, देवता, सकारात्मक ऊर्जा, व लक्ष्मी यांचा प्रवेश होत असतो. व आपली गरिबी मिटू शकते. स्वस्तिक ऐवजी तुम्ही ओम देखील काढू शकता. स्वस्तिक मध्ये सर्व देवी देवता वास करतात. मित्रांनो तुम्ही केवळ हळदीचा वापर करून हा उपाय सुद्धा करू शकता.

या स्वस्तिक आणि ओम मुळे तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होण्यास मदत होते. एक किंवा दोन महिन्यानंतर हे स्वस्तिक किंवा चिन्ह बदलणे विसरू नका. आपल्या घरातील उमरा चौकट व दरवाजा हे स्वच्छ ठेवा सुशोभित दिसावे. सणावाराला तोरण लावने सुद्धा विसरू नका. हेसुद्धा सकारात्मक ऊर्जेचे आकर्षित करत असतं.

आणि मित्रांनो तिसरा उपाय आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी सामग्री लागेल त्यामध्ये एक सफेद पांढरा रंगाचा कपडा, सोबतच एक सुपारी, एक हळकुंड त्या हळकुंडाला गाठ असावी. एक बिबा आणि थोडेसे अक्षद म्हणजे तुटलेले तांदूळ. ही सामग्री आपण घ्यायची आहे एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यात.

मित्रानो जेव्हा एखादा शुभ मुहूर्त असेल चांगला दिवस असेल तर तू चांगला दिवस पाहून आपण हा उपाय करा. गुरुवारी केलात तरीही चालेल किंवा माता लक्ष्मी चा वार आहे मंगळवार, शुक्रवार या दिवशी केला तर अति उत्तम.

तर आपण एक सफेद रंगाचा कपडा घ्यायचे आहे. त्यामध्ये एक सुपारी ठेवायचे आहे. त्याच्या शेजारी एक हळकुंड ठेवायचा आहे. एक बिबा ठेवायचा आहे. आणि थोडेसे अक्षद सुद्धा आपण त्या कपड्यात टाकायचे आहे. आणि त्याची एक पुरचुंडी बांधा.

आणि ती आपल्या घरात दरवाजावरती टांगून ठेवायचे आहे. जर दरवाजावर टाकणं शक्य नसेल तर आपल्या घरात जिथे साफसफाई असते अशा ठिकाणी म्हणजेच छताला लटवून आपल्यालाही पोटली ठेवायचे आहे. जोपर्यंत ही पोचली आपल्या घरात असेल तोपर्यंत आपल्या घरात सुख शांती लाभेल. घरामध्ये कटकटी होणार नाहीत.

ज्या ठिकाणी कटकट नसते त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते. हा उपाय आपण आपल्या देवघरा समोर बसून करायचा आहे. आपण जे काही उपाय करणार आहे ते करणे अगोदर आपण आपल्या कुलदेवतेचे स्मरण नक्की करा. तुमची कोणी गुरु असतील त्या गुरूंचे नक्की स्मरण करा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment