
कडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खायलाच हवी असा सल्ला तुम्ही या आधी घरातील मोठ्या व्यक्तिंकडून नक्कीच ऐकला असेल, आणि ते खरं देखील आहे. चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमंध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक प्रकारचे त्वचा रोग, दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होते. आयुवेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले असून, थंडीत कडुलिंब शरीरासाठी फायदेशीर ठरतो. साऊथचे लोक संक्रांती तसेच गुढीपाडवा सणाच्या काळात गुळाच्या पाण्यात कडुलिंब टाकुन काढा बनवतात. चला तर मग जाणुन घेऊ कडुलिंबाचे फायदे.
- पोटामध्ये जंत झाल्यास..
पोटांच्या आजारावर कडुलिंबाचा रस अतिशय गुणकारी ठरतो. अती गोड खाल्यास किंवा इतर कारणाने जंत झाल्यास कडुलिंबाच्या रसात मध आणि काळी मिरी घालुन पिल्यास पोटाचे विकार नाहीशे होण्यास मदत होते. - चेहऱ्यासाठी..
चेहऱ्यावर येणारे फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाची पान, साल आणि फळ यांच्या एकत्रित मिश्रणाचा लेप लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्याने त्याचा फायदा होता. मात्र या सगळ्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम. - कान आणि दातांसाठी..
दात स्वच्छ करण्यासाठी आजही अनेक लोक कडुलिंबाच्या झाडाची काठी वापरतात. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मजत होते. तोंडाला जर दुर्गंधी येत असेत तर त्यापासून सुटका मिळते. तसेच अनेक टुथपेस्टमध्ये देखील कडुलिंब असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर कडुलिंबाचे तेल कानात टाकल्यास कानात येणारे पाणी किंवा कान दुखण्यापासून आराम मिळतो. कान हा संवेदनशील भाग असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या. - केसांच्या आरोग्यासाठी..
कडुनिंबाच्या कडवटपणा मुळे त्याचा जंतु किटाणु मारण्यासाठी उपयोग होतो. तेंव्हा केसात कोंडा झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर अशावेळी कडुलिंबाचे तेल किंवा अंघोळीच्या पाण्यात उकळुन कडुलिंबाचा पाला टाकणे फायदेशीर ठरते. - त्वचेचे विकार..
कडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे संसर्गजन्य त्वचा रोगावर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणे टाकल्यास फायदा होतो. कारण कडुलिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.
या व्यतिरिक्त कांजण्या किंवा गोवर तसेच देवी सारख्या साथीच्या आजारांच्या वेळी घरगुती उपाय म्हणून कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकली जातात.
कडुलिंब थंड असल्याने अंथरुणात अंगाखाली अशा वेळी कडुलिंबाची पान ठेवली जातात.
डायबिटिस असणाऱ्या लोकांसाठी देखील कडुलिंबाचा रस फायदेशीर ठरतो.
तांदळाला किड लागु नये, उंदरांपासून रक्षण करण्यासाठी सुकलेला कडुलिंबाचा पाला टाकला जातो. साठवणुकीच्या धाण्यात कडुलिंबाचा पाला टाकल्यामुळे त्या वासाने किडे किंवा उंदीर घुशी त्यापासून दुर राहतात.