क्रोध अनावर होतो, राग येतो.!! स्वामींचा हा संदेश तुम्हाला शांत करेल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो स्वामी नळदुर्गमध्ये असताना तिथे रामेश्वर नावाचा एक व्यक्ती पुराने सांगत होता. तो खूप विद्वान होता विना वाजवून तो पौराणिक सांगत होत असे. त्याला गायन कला अवगत होती. नळदुर्ग मध्ये आपले पुराण सांगावे असे त्याला वाटत होते. पण सर्व नळदुर्गवासी स्वामींच्या भक्तीत रममाण होते.

त्यामुळे त्याची काही डाळ शिजली नाही. आधीच ज्ञानाचा अहंकार तसेच त्यात तेथील लोक हे स्वामींच्या भक्तीत विलीन. हे सर्व बघून तो द्वेषाने फणफणला. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. तो स्वामींची निंदा करू लागला. स्वामींना हा सर्व प्रकार लक्षात आला. एके दिवशी स्वामी बसले होते त्यांचे सर्व सेवेकरी देखील तेथेच बसली होती. त्यात हा महाशय देखील बसलेला होता.

स्वामींनी सगळ्यांकडे पाहिले. व म्हणाले अरे बाबांनो तुम्ही याला पुराना श्रवणाचा कार्यक्रम करू देऊन शांत करा. स्वामींना सर्वांविषयी प्रेम आहे त्यामुळे त्यांनी त्या महाशयांला श्रवणाचा कार्यक्रम करण्यास सांगितले. स्वामींची अशी अज्ञा असल्यामुळे सर्व भाविक तयार झाले. सर्व व्यक्तींनी त्या महाशयाकडे बघून तोंडे मुरडली व दुसऱ्या दिवशी कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले.

तेव्हा त्या महाशयास पश्चाताप झाला कि, आपण स्वामींचा द्वेष केला नको -नको ते आपण त्यांना बोललो. परंतु स्वामी हे एक परमेश्वर आहेत. स्वामी हे लोकांच्या चुका माफ करून त्यांना योग्य तो मार्ग दाखवितात. असा विचार करत त्याने स्वामींच्या चरणी लोटांगण घेतले नंतर स्वामी त्याचा उरलासुरला अहंकार देखील नष्ट करतात.

स्वामीभक्तहो आता दुसरा दिवस उजाडतो. पुराण कथेचा कार्यक्रम सुरु होतो. या कार्यक्रमास स्वतः स्वामींनी यांनी हजेरी लावली. महाशय पुराणातील या कार्यक्रमात पुत्रास पुण्य प्राप्त होते. निपुत्रिकास नाही. असे काहीतरी प्रवचन करू लागला. त्यामुळे स्वामींचा क्रोध अनावर झाला. क्रोधाने स्वामीनी त्याला खडसावले. खडसावत ते त्याला म्हणाले कि, अरे काहीही बडबडू नकोस पोकळ पंडितांच्या गप्पा मारून लोक मनोरंजनाचा कार्यक्रम करू नकोस.

पुत्रावाचून मोक्ष नाही हे तुला कोणी सांगितले. वामदेव व्यासांना पुत्र होते का ? पोपटाला पुत्र आहे का? तू देखील निपुत्रिक आहेस हे अजिबात विसरू नकोस. निपुत्रिक असल्यामुळे तू देखील अधोगतीला जाशील काय? येथे परमेश्वराचे गुणगान गायचे सोडून भलते सलते काय बडबडतो आहेस. पुत्रापासून बापाला मोक्षप्राप्ती प्राप्त होत असेल तर कुत्र्या -मांजरांना जास्त पुत्र प्राप्त होत असतात मग त्यांना तर कधीच मोक्ष मिळायला पाहिजे होता.

हे ऐकून महाशयांनी आपले पुराण संपवले व घाईगडबडीने जावून स्वामींचे चरण पकडले व स्वामींची माफी मागितली. स्वामी मला क्षमा करा मी विना वाजवून लोकमनोरंजन करून पैसा कमावतो. माझ्यावर कृपा करा. एखादे बाळ चुकले तर त्याची आई त्याला माफ करते तुम्ही माझे परमेश्वर आहात तुम्ही मला क्षमा करून मला गती प्रदान करा. असे म्हणून, जोळप्पाळ यांच्याकडे गेला.

तिथे गेल्यावर स्वामिनी पोपट आणि वीणा वाला यांचा उल्लेख कोणासाठी केला असे त्याने विचारले. तेव्हा पोपट म्हणजे शुक्राचार्य. विनावाला म्हणजे नारदमुनी. असा‌ स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आहे असे सांगितले. आपल्यातील अनेक संत मंडळींनी लोकांच्या अशाच अहंकाराचा नाश करण्यासाठी अनेक काम केले.असो थोडक्यात आपण सर्व एकाच सागराच्या लाटा आहोत.

याचा विसर पडून मी कोणीतरी वेगळा आहे अशा खोट्या धारणेच्या नादात काही लोकं खोटा अहंकार मिरवत असतात. जेव्हा या अहंकाराला कोणीतरी डिवचले तर त्या अहंकाराचा द्वेषात, क्रोधात, मत्सरमध्ये, गोष्टींमध्ये होते. या सर्व गोष्टींबरोबर कसे वागायचे, या सर्व अहंकाराला कसे नमवायचे हे स्वामींनी आपणास याची कला वरील लिलेतुन आजच्या लेखातून आज सांगितली आहे. आजच्या स्वामी वाणी मध्ये स्वामींनी अगदी सौम्य आवाजात बोलून अहंकारावर घाव घालुन क्षणात त्याचे पाणी केले.

म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या नीलेतून बोध घेता येतो.संवाद कौशल्य ही कला अवगत करावयाची आहे. एखाद्या अहंकाराला डिवचून सौम्यपणे बोलून त्या अहंकाराचा आपल्याला नाश करावयाचा आहे. आपण जेव्हा संयम ठेवून, जागृत राहून नम्रपणे वार्तालाप करतो, तेव्हा समोरच्या माणसातील अहंकार हा विलीन,नष्ट होतो. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूयात हे स्वामी महाराज आम्ही सर्व तुमचे बाळ आहोत आज तुम्ही आम्हाला खूप छान समज दिली.

तुमच्या लेखातून ही समज आज तुम्ही दिलीत, नम्रताच्या साह्याने या अहंकारावर कशी मात करायची याची शिकवण तुम्ही आम्हाला दिलीत. त्यामुळे अनंत कोटी धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment