नशिबवान व्यक्ती कोणत्या दिवशी जन्माला येतात.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, सुरूवात करुयात रविवार पासुन, ज्या पण व्यक्तींचा जन्म रविवारच्या दिवशी होतो. त्यांच्या वर सुर्यदेवांची भरपूर कृपा असते.!! या दिवशी जन्मलेली व्यक्ती सूर्या समान तेजस्वी असते. त्याचबरोबर नशीबवान देखील असते.., भाग्यशालीही असते, त्या व्यक्तींना दीर्घायुष्य प्राप्त होत असते. आणि मित्रांनो त्यांचा स्वभाव मुळातच शांत असतो. आणि या व्यक्ती कोणाच्याही कामामध्ये, कधीही नाक खुपसत नाहीत. आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कुणी नाक खूपसलेलं त्यांना अजिबात सुद्धा आवडत नाही. किंवा सहन होत नाही. ज्या व्यक्ती त्यांच्या कामात सतत अडथळा आणतात, त्यांचा त्यांना प्रचंड राग येत असतो.

सोमवार – सोमवारी जन्म झालेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो, अत्यंत गोडबोले असतात. खूप गोड बोलतात सतत हसतमुख असतात, चेहरा सतत हसरा असतो. या व्यक्ती सतत खुश असतात कधीच या व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाहीत. मात्र यांचा स्वभाव चंचल असतो. आणि चंचल असल्यामुळेच, या कधीच ठाम निर्णय घेत नाहीत. यांचे निर्णय सतत बदलत राहतात. मित्रांनो यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. सोमवारी जन्म झालेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना लवकर घेता येत नाही. हे व्यक्ती आपल्या आई वरती खूप जास्त प्रेम करतात.

मंगळवार – ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो. त्यांच्यावरती श्री हनुमानाची कृपा आढळते. हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात. मात्र स्वभावाने चांगले असले तरी सुद्धा, हट्टीपणा यांच्यामध्ये खूप असतो. एखादी गोष्ट त्यांना आवडली किंवा त्यांच्या मनामध्ये जर भरली, तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ते अगदी काहीही करू शकतात. मित्रानो मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्ती ईमानदार असतात. दुसऱ्यांची मदत करतात. अगदी कोणत्याही स्वार्थाविना हॅलो दुसऱ्यांची मदत करतात. यांना ऐश्वर्याआरामाचं जीवन जगणे पसंत असतं. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा हे लोक विचारही करत नाहीत. दुसऱ्या प्रती सातत्याने इमानदारी बाळगतात.

बुधवार – ज्या व्यक्तींचा जन्म बुधवारी होतो त्या व्यक्तींना धार्मिक कार्याची प्रचंड आवड असते. हे लोक धार्मिक कार्य देव देव खूप करतात. यांची बुद्धी तेजस्वी असते. अत्यंत तेजस्वी बुद्धीचे, बुद्धिमान अशा प्रकारचे हे लोक असतात.

गुरुवार – ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो.या व्यक्तींच वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्या कठीण परिस्थितीवर मात कशी करायची, हे यांना खूप चांगलं जमतं. कितीही कठीण प्रसंग येऊ द्या! त्या प्रसंगातून ते अगदी अलगत बाहेर पडतात. मित्रांनो दुसऱ्या वरती छाप कशी सोडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकावं, ज्या ठिकाणी जातात तेथे स्वतःचा ठसा उमटवतात. त्यांच्या वागण्यातून त्याच्या बोलण्यातून समोरची व्यक्ती आपोआपच प्रभावी होतात. समोरच्या व्यक्तीवर प्रचंड इम्प्रेशन टाकण्याची ताकद या गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असते.

शुक्रवार – मित्रांनो ज्या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी झालेला असतो. या व्यक्ती बुद्धिमान असतात. आणि यांचा स्वभाव हा अतिशय छान असतो सहनशील असतात. तुम्ही त्यांना किती हि पीडा द्या, त्रास द्या. मात्र या व्यक्ती हा त्रास सहन करतात. तुमचं मन कधीच त्या दुखावणार नाहीत. कारण शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्ती भाऊक असतात, भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान असत.

मित्रांनो तुम्ही या लोकांची चेष्टा करा मस्करी करा ती त्याला कधीच सिरीयसली घेणार नाहीत. अत्यंत जिंदादिल अशा प्रकारच्या या व्यक्ती आहेत. मात्र शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्तीच एक वैशिष्ट्य असं की या विचारांनी या स्थिर असतात. आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समोरच्याला लवकर समजत नाही. आपल्या मनातील गोष्ट त्या कधीचं सहजासहजी दुसऱ्याला सांगत नाही.

शनिवार – ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो, त्यांच्यावरती शनि महाराजांची कृपा असते, शनी देवांची कृपा असते. मित्रांनो या व्यक्तीवर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. या व्यक्ती स्वतः मध्ये मस्त राहतात. अगदी मंनमोजेपणे त्या जीवन जगतात. एखाद्याला त्यांनी वचन दिलं तर ते वचन त्या कधीच तोडत नाहीत. प्राण जाये पर वचन न जाये, अशा प्रकारे त्या वागतात.

आणि म्हणून दुसऱ्याची मन सहज जिंकून घेतात. या व्यक्ती हसतमुख असतात, सातत्याने हसत असतात. आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामुळे वातावरणात निर्माण होतं. त्या ज्या ठिकाणी जातात, तिथल्याच होतात. कुठल्याही परिस्थिती अगदी सहज बेमालूमपणे मिसळतात. आणि म्हणून लोकं यांच्यावरती प्रेम करतात.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment