प्रवासात मळमळणे होईल कायमचे बंद..!! करा फक्त हे उपाय..

अरे तुला माहीती नाही त्याला गाडी लागते..?? असा त्रास असणाऱ्यांनी आता घाबरून जाण्याचे कारण नाहीए असे बरेच लोक आहेत की ज्यांना फिरायला भरपूर आवडते, परंतु या एका सवयी मुळे ते कुठे बाहेर जाण्याचं टाळत असतात त्याचं कारण म्हणजे त्यांना प्रवास करताना होणाऱ्या उलट्या…

काहींना श्वास घेण्यास त्रास होतो, अस्वस्थ वाटतं, तसेच घाबरल्यासारखं होतं अशा काही समस्या होतात. नॉरमली प्रवास करणं प्रत्येकासाठी सोपं नसतं. अनेकांना गाडी किंवा बस मध्ये बसताच मळायला होतं किंवा त्यांना उलट्यांचा त्रा’स होत असतो.

त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं तर दुरच त्यांच्या प्रवासाचा मूडच स्पॉइल होऊन जातो, त्यांचे प्रवासाकडे नीट लक्षही नसते आणि त्यांच्यासोबतची कुणी असतील तर ते सुद्धा या कारणामुळे प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाहीत. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर आता नाराज होण्याची गरज नाही.

आज आम्ही तुम्हाला उलट्यांपासून छुटकारा कसा मिळवायचा याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. खरं तर या उलट्या मेंदू ,कान आणि डोळे यांचा ताळमेळ होत नसल्यामुळे होतात आणि यामुळे आपल्याला नेहमीच मळमळल्यासारखे जाणवते आणि उलट्या चालू होतात.

प्रवासाच्यादरम्यान, जेव्हा तुम्हाला मळमळायला होईल तेव्हा लगेच तोंडात एक लवंग टाकून घ्यायची आहे. व ती तोंडातच ठेवायची, चावून गिळून घ्यायची नाही. चघळत रहखयची आहे. असं केल्याने, आपली मळमळ लगेचच थांबेल. प्रवासाला निघण्यापूर्वी घरातून निघताना जर बडीशेप खाऊन निघाल तर हा त्रा’स होत नाही.

तसेच तुम्ही थोडी बडीशेप स्वत:जवळ ठेवून राखा. प्रवासाच्या दरम्यान उलटी किंवा मळमळ जाणवत असेल तरी थोडी थोडी बडीशेप अधूनमधून खात राहावी. पेपरमिंटमुळे उलट्या देखील बंद होतात. प्रवासाच्या दरम्यान, आपण पुदीनाच्या तेलाचे काही थेंब रुमालवर शिंपडून घ्यावे आणि त्याचा वास घेत रहावा, असं केल्याने आराम मिळतो.

पुदीन्याच्या पानांमध्ये कोमट पाणी आणि एक चमचे मध घालून घ्यावे हे मिश्रण कुठेही निघतांना पिऊन मगच निघा. यामुळे आपला प्रवास आरामदायक राहील.
उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास असणार्‍यांना प्रवासात उलटीचा त्रास वाढू शकतो. अशावेळेस मधात एकत्र केलेला सुका आवळा किंवा आवळा कॅन्डी चघळणं फायदेशीर असतं. असं केल्याने सुद्धा बराच फरक पडतो.

तसेच उलटी मळमळ असे त्रास होत असेल तर लिंबू सरबत पिल्याने देखील आराम मिळतो. प्रवासाच्या दरम्यान उलटीच्या सुटकेसाठी जिरा पावडर व पाणी एकत्रित करून प्यावे.

अपचनामुळे पित्त झाले असल्यास प्रवासात उलटीचा त्रास टाळण्यासाठी ओवा सुद्धा फायदेशीर ठरतो. घरातून निघण्यापूर्वी गरम पाण्यात अर्धा लिंबू व चिमूटभर काळी मिरीची पावडर घातलेले पाणी प्यावे. शक्य असल्यास प्रवास करताना संत्र्याचं ज्युस सोबत घ्यावे. शक्य नसेल तर संत्र्याच्या फ्लेवर वाल्या गोळ्या सोबत ठेवाव्या.

त्या गोळ्यांनीही आराम मिळतो. लिमलेटच्या किंवा संत्र्याच्या स्वादाच्या गोळ्या, वेलदोड्याचा फ्लेवर असणारी चाॅकलेट्स, केळी सुद्धा प्रवासाच्या दरम्यान सहज उपलब्ध असतात, तुम्ही याचासुद्धा उपयोग करू शकता. डाळिंब पावडर किंवा आलं खाल्ल्याने प्रवासातील उलट्यांचं टेन्शन कमी होते.

जेव्हा तुम्ही प्रवासासाठी निघता तेव्हा एक लिंबू आपल्याबरोबर ठेवावा. या लिंबाचा तुम्ही फक्त वास घ्यायचा आहे. असे केल्याने उलट्यांचा त्रास होणार नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी उलटी होईल या भीतीने तुम्ही रिकाम्यापोटी निघू नका. बिस्किटं, तसेच हलका आहार करूनच बाहेर पडा. तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. तिखट पदार्थ पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे ते टाळावे.

सूचना- आम्ही ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आ’जाराने सं’क्रमित असल्यास तुम्ही डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नये.

Leave a Comment