उपवासामध्ये हमखास खाल्ला जाणारा शाकाहारी असलेला साबुदाणा नक्की कसा बनतो …???

शिवरात्री असो किंवा नवरात्र उपवासासाठी साबुदाना हा खास पदार्थ आहे. हलवा, खिचडी आणि खीर करून साबुदाण्याला वेगवेगळ्या चवींमध्ये आपण तयार करतो.

कुठलाही उपवास असो साबुदाना हा हमखास असतोच. मात्र साबुदाना नेमका कसा तयार केला जातो? कुठल्या झाडापासून तयार होतो?, हे अजून कुणालाचं माहित नसेल…

नेमका कुठून येतो साबुदाना?

सागो नावाचं झाड असतं. याच झाडापासून साबुदाना तयार केला जातो. केरळमध्ये याला कप्पा म्हणतात. साबुदाना हा सगळ्यात जास्त उत्तर भारतात खाल्ला जातो आणि त्याचा उगम दक्षिणेत होतो. साबुदानाचं उत्पन्नसुद्धा दक्षिणेत जास्त होतं.

बघायला गेलं तर स्मार्ट टेक्नोलॉजीसाठी हे अंतर खूप नाहीये. मात्र आजपर्यंत साबुदाना कशापासून तयार होतो, हे जाणण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. जर प्रयत्न केला असता तर कदाचित उपवासाच्या मेन्यूमधून साबुदाना बाहेर पडला असता आणि मग उपवासाला खाण्याजोगं काही उरलंच नसतं.

कसा बनवला जातो साबुदाना?

साबुदाना हा शाकाहारी आहे. साबुदाना तयार होताना तो खराब होतो. सागो झाडाच्या मुळांना कापून त्यांना ट्रकमध्ये टाकून तमिलनाडू, केरल, कर्नाटकच्या फॅक्टरीमध्ये पोहचवलं जातं. तिथे त्या मुळांवर प्रक्रिया केली जाते.

त्या मुळांना सोलून त्याचा गर काढला जातो. तो फॅक्टरीमध्ये खूप वेळा घासून त्याचे तुकडे पाडले जातात… नंतर त्याला पाण्यात मोठ्या टाक्यांमध्ये ठेवलं जातं.

याच ठिकाणी साबुदाण्याला बराच काळ ठेवलं जातं, तो साबुदाना सडेपर्यंत त्यात किडे पडेपर्यंत त्याला तिथंच ठेवण्यात येतं.

तेच किडे शाबुदाण्याला स्वादिष्ठ बनवतात. भरपूर दिवस त्याला त्या टाक्यात ठेवल्यानंतर साबुदाण्याला दाणेदार बनवलं जातं. त्याला पाॅलिश करण्यात येतं, त्यानंतर त्याला पॅकिंगसाठी पाठवण्यात येतं.

खास गोष्ट ही आहे की, साबुदाना हा शाकाहारी आहे. जर उपवास करुन कुठल्या देवाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही नक्की उपवासाला काय खाताय? यावर नक्कीच लक्ष द्यायला हवं…!!

Leave a Comment